Is Your Metabolism Strong: निरोगी पचनसंस्था असलेली व्यक्ती आजारांपासून दूर असते. याचाच अर्थ स्वच्छ पोट तुमचे एकूण आरोग्य सुधारते. काही लोकांना सकाळी उठून सर्वात आधी फ्रेश होण्याची सवय असते, मात्र बरेच जण सकाळी नाही तर संध्याकाळी फ्रेश होणे पसंत करतात.
काही लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि ते दररोज स्वत:ला आराम देऊ शकत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या आतड्यांच्या हालचालींमध्ये कोणताही बदल तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. तुमची पचनसंस्था देखील यानुसारच कार्य करते.
तुम्ही शौचास कोणत्या वेळी जाता यावरून तुमचे पोट, आतडे आणि चयापचय याबद्दल बरेच काही दिसून येते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, सकाळी आतडे अधिक सक्रिय असतात आणि म्हणूनच बहुतेक लोक सकाळी शौचास जातात. जर तुम्ही सतत संध्याकाळी किंवा अनियमित वेळी शौचास जात असाल तर ते तुमच्या आतड्यांचे कार्य, प्रेशरची पातळी आणि खाण्याच्या पद्धतींबद्दल बरेच काही प्रकट करते. तर निरोगी आतडे राखण्यासाठी शौचाच्या वेळा कशाप्रकारे पाळाव्यात याकडे लक्ष द्या.
सकाळी फ्रेश व्हा
बहुतेक लोकांना सकाळी लवकर फ्रेश वाटते, यामागचं करण म्हणजे पोट आणि आतड्यांची हालचाल २४ तास सारखी राहत नाही. संशोधनानुसार, आतड्याच्या हालचालीची स्वत:ची अशी एक सर्केडियन लय देखील असते, जी दिवसा वेगवान असते आणि रात्री मंद असते. सकाळी फ्रेश होऊन जागे होणे हे तुमचे शरीर आणि आतड्यांचे घड्याळ चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे लक्षण आहे.
संध्याकाळी शौचास जाणे
जर तुम्हाला दररोज संध्याकाळी अस्वस्थ वाटत असेल, तर याचा अर्थ तुमचे शरीर आणि आतड्यांचे घड्याळ समन्वयाने काम करत नाहीये. रात्री आतड्याची हालचाल मंदावते, त्यामुळे काही लोकांना संध्याकाळी उशिरा शौचास जावे लागते. हे अनेक कारणांमुळे असू शकते जसे, रात्री उशिरा जेवणे किंवा झोपेचा त्रास होणे. रात्री उशिरा जेवल्याने आतड्यांचे लय बिघडते आणि त्यामुळे केवळ पचनक्रियाच बिघडत नाही तर चयापचयाचा लयदेखील बिघडतो.
चयापचयाशी संबंध
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आतडे आणि चयापचय हे शरीराच्या वेळेशी जोडलेले आहेत. झोप, अन्न किंवा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत कोणताही अडथळा केवळ कोलॉन कार्यावरच परिणाम करत नाही तर शरीरातील इतर कार्यावरदेखील परिणाम करतो. यामध्ये साखर नियंत्रण आणि चरबीचे चयापचय यांचा समावेश आहे. दररोज सकाळी ताजेतवाने वाटणे हे समन्वय असलेले चयापचय दर्शवते. तसंच संध्याकाळी किंवा अनियमित शौचाच्या वेळा ही घडी विस्कटू शकतात.
जर तुमच्या आतड्यांच्या हालचाली अचानक बदलत असतील किंवा तुम्हाला वेदना किंवा रक्तस्त्राव यासारख्या समस्या येत असतील तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. याव्यतिरिक्त वजन कमी होणे आणि सतत पोटफुगी येणे यासारख्या समस्या सर्केडियन रिदम डिसऑर्डर, आयबीएस (irritable bowel syndrome) किंवा functional constipation यांच्याशी जोडल्या जाऊ शकतात. जर या समस्या कायम राहिल्या तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फ्रेश होण्याची योग्य वेळ
तज्ज्ञांच्या मते, स्वत:ला फ्रेश करण्याचा सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सकाळच्या आतड्यांच्या हालचाली सर्केडियन लयीनुसार असतात. झोपेमुळे पचनसंस्थेला पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी आणि मोठ्या आतड्यात विषारी पदार्थ ढकलण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. जागे झाल्यानंतर सुमारे ३० मिनिटांनी पचनसंस्था असे संकेत पाठवते ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आतड्यांची हालचाल करण्याची इच्छा होते.
सकाळी सगळेच जण फ्रेश होऊन उठतात असं नाही. जर तुम्हाला सकाळी शौचास जाण्याची सवय स्वीकारायची असेल तर काही सोपे उपाय तुम्ही करू शकता.
- पुरेशा प्रमाणात पाणी प्या
- संध्याकाळी चालणं ठेवा
- सकाळी सकाळी काहीतरी खा
- आहारात ओमेगा-३ समाविष्ट करा
