Jaswand Flower Growing Tips in Marathi:  आपल्या बाल्कनीची शोभा वाढविण्यासाठी आपण विविध प्रकारची रोपं लावतो आणि मग ती रोपं चांगल्या रीतीनं बहरावीत यासाठी रोज काही ना काही उपाय करीत असतो. पण, तुम्ही हे काम जर योग्य पद्धतीनं केले नसेल, तर या मेहनतीचा फार काही उपयोग होतोच असं नाही. विशेषतः फुलझाडांसाठी महागड्या खतांची गरज नसते; तर तुम्ही अगदी घरगुती पद्धतीनेसुद्धा खत तयार करून रोपांना बहर आणू शकता.

जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरातल्या दोन वस्तूंचा वापर करून खत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. हिवाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्याचबरोबर जास्वंदच्या झाडाला कीड लागते तर त्यासाठी कोणती कीटकनाशके फवारायची, याचीदेखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

कुंडीमध्ये लावलेल्या जास्वंदाच्या झाडाला कळ्याफुले येण्यासाठी वेळोवेळी खत टाकणे आवश्यक असते; पण त्याचबरोबर झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. 

काबुलीचे चणे (Hibiscus flower Gardening Tips)

काबुलीचे चणे पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचे. १ मग पाण्याचा खत म्हणून वापर करायचा. या पाण्यामध्ये खूप सारी पोषकतत्त्वे असतात. ज्यामुळे झाडे चांगली वाढतात. तसंच झाडावरील पाने हिरवीगार होण्यासाठी या पाण्याचा चांगला फायदा होतो. तसंच या पाण्याचा तुम्ही सर्व प्रकारच्या झाडांना खथ म्हणून वापर केला तरी खूप चांगला फायदा होतो. यात नायट्रोजन, पोटॅशियम, झिंक यासारखे घटक असतात जे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

अंड्याची टरफले

१ ते ३ अंड्याची टरफले घ्या. अंड्याच्या टरफलांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन यासारखे घटक असतात त्यामुळे आपली झाडे चांगली वाढतात पण झाडावरील फांद्या सुदृढ, मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. झाडाच्या फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढीच जास्त त्यावर कळ्या आणि फुले लागतात. अंड्याच्या टरफलांचा वापर करू शकत नसाल तर दही किंवा ताक यांचा वापर करा.

लिंबाच्या साली

लिंबाच्या साली या आम्लयुक्त असतात आणि त्याच्या वापरामुळे झाडाच्या कुंडीतील माती ही आम्लयुक्त होते आणि झाडांना कळ्या-फुले येण्यासाठी या आम्लयुक्त मातीचीच गरज असते. मात्र याचा वापर प्रमाणात करायचा आहे. एका कुंडीसाठी फक्त एक ते दोन तुकडे एवढ्याच लिंबाच्या सालीचा वापर करा आणि तोही महिन्यातून एकदाच करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप- खत देण्यापूर्वी कुंडीतील माती हलवून मोकळी करावी. मग ही तिन्ही खते एक एक करून या कुंडीतील मातीत टाकायची