Jaya Kishori : प्रेरणादायी वक्त्या जया किशोरी नेहमी आयुष्याचा मूलमंत्र सांगतात. व्यक्तीने जीवन जगताना कसे वागावे, याविषयी जया किशोरी नेहमी प्रेरणादायी विचार व्यक्त करतात. जया किशोरी यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण त्यांचे विचार आचरणात आणतात. मैत्री कशी असावी? याविषयी जया किशोरी यांनी सुंदर विचार मांडले आहेत. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत …

  • जया किशोरी सांगतात की, मैत्री करताना समोरच्या व्यक्तीचा माइंडसेट जुळणे खूप गरजेचे आहे. जर माइंडसेट जुळत असेल, तर मैत्री अधिक काळ टिकू शकते. जर तुमचे विचार जुळत नसतील, तर मैत्री फार काळ टिकणार नाही. मैत्रीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा : Jellyfish parenting : पालकांनो, मुलांना असे बनवा आत्मविश्वासू आणि जबाबदार, हा फॉर्म्युला १०० टक्के काम करणार, एकदा वाचाच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • जर तुमचे मित्र खूप सकारात्मक विचारांचे असतील, तर त्याचा चांगला परिणाम तुमच्यावरही दिसून येईल. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचा इशारा जया किशोरी देतात.
  • जया किशोरी यांच्या मते, वाईट संगत असेल, तर त्याचा व्यक्तीवर लवकर परिणाम दिसून येतो. जर तुमची संगत वाईट असेल, तर अशा मैत्रीतून लवकर बाहेर पडा.
  • मित्रांची संख्या कमी असली तरी चालेल; पण ते मित्र चांगले असावेत. काही लोकांना भरपूर मित्र असतात; पण अडचणीच्या वेळी त्यांच्यापैकी कुणीही मदतीला धावून येत नाही. त्यामुळे जया किशोरी सांगतात की, आयुष्यात एकदोन मित्र असले तरी चालेल; पण ते चांगले मित्र असावेत. मित्र ओळखताना कधीही चुका करू नये.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)