देशभरात सणासुदीचा काळ लक्षात घेऊन टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास बंपर ऑफर आणली आहे. JIOPHONE DIWALI 2019 OFFER अंतर्गत ग्राहकांना Jio phone खरेदी करताना ८०० रुपयांची सवलत मिळेल. याशिवाय अतिरिक्त इंटरनेट डेटाही मिळेल. विशेष म्हणजे यासाठी जुना फोन एक्स्चेंज करण्याची देखील आवश्यकता नाही.

या विशेष ऑफरनुसार ग्राहकांना १५०० रुपयांचा जिओफोन केवळ ६९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. यासोबतच ७०० रुपयांचा अतिरिक्त इंटरनेट डेटाही ग्राहकाला वापरता येईल. यानुसार ग्राहकांना पहिल्या सात रिचार्जवर कंपनीकडून ९९ रुपयांचा अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजेच १५०० रुपयांचा हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १५०० रुपयांचा फायदा होणार आहे. पण, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकाला किमान ९९ रुपयांचं रिचार्ज करावं लागेल. ही ऑफर दिवाळीपर्यंतच असेल, त्यानंतर ग्राहकांना या फोनच्या खरेदीसाठी १५०० रुपये मोजावे लागतील.

जिओ फोनचे फीचर्स –

-फोनमध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. यासोबत टी-9 की-पॅड देखील मिळेल.
-पुढील बाजूला 0.3 मेगापिक्सल आणि मागील बाजूला 2 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे.
-512MB रॅम आणि 4GB इंटरनल स्टोरेज
– मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येईल.
-KaiOS वर हा फोन कार्यरत असेल
-2000mAH क्षमतेची बॅटरी
-4G VoLTE, FM रेडिओ, ब्ल्यु-टूथ, वाय-फाय, जीपीएस आणि एनएफसी यांसारखे फीचर्स