Kitchen Jugaad Video: आपलं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी मेकअपचा आधार घेण्यात येतो. मेकअपमध्ये इतर ब्युटी प्रोडक्ट्सपेक्षा सर्वचजण वापरत असलेलं ब्युटी प्रोडक्ट म्हणजे, टॅल्कम पावडर. टॅल्कम पावडर हे सौंदर्य प्रसाधन गेली अनेक दशके घराघरातून दिसत आहे. पण चेहऱ्यावर पावडर लावणे याखेरीज त्याचे इतर फायदे आहेत याची कल्पना फार थोड्या लोकांना असेल. टाल्कम पावडर चेहऱ्याला लावला जातो, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण तुम्ही कधी केस विंंचरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कंगव्यावर टाल्कम पावडर लावून पाहिलात का? नाही ना, मग एका गृहिणीने दाखविलेला अनोखा जुगाड करून पाहा.
गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. दरम्यान असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. केस विंंचरण्यासाठी कंगव्याचा वापर आपण दररोज करतो. काही घरातील लोक एकच कंगव्याने केस विंचरतात. वारंवार एकच कंगवा वापरल्याने कंगवा घाण होऊ शकतो. त्यामुळे कंगव्याला साफ करणे तितकेच गरजेचं आहे. कंगवा साफ करणे हा वेळखाऊ काम आहे. परंतु, कमी वेळात झटपट कंगवा साफ करायचं असेल तर, महिलेने जुगाड दाखविला आहे. या पद्धतीने कंगवा लगेच साफ होईल, असे महिलेचे म्हणणे आहे.
(हे ही वाचा: Jugaad Video: महिलांनो, कपाळावरची टिकली तुमच्या घरच्या चिमटा-चमच्याला नक्की लावा; ‘या’ मोठ्या समस्येतून होईल सुटका)
नेमकं काय करायचं?
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने, कंगवा घेतला आहे आणि त्यावर टाल्कम पावडर घातलं आहे. यासाठी मुदत संपलेला टॅल्कम पावडर वापरु शकता, असे महिलेने सांगितले आहे. टाल्कम पावडर कंगव्यावर टाकल्यानंतर ब्रशच्या मदतीने कंगव्याला घासून महिलेने कंगव्यातील घाण स्वच्छ केली आहे. या ट्रिकने तुमचा कंगवा नव्या सारखा दिसून येईल, असे महिलेचे म्हणणे आहे.
येथे पाहा व्हिडिओ
Amey Trendy tips या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)