Karva Chauth Romantic Gifts Ideas : पत्नीला या’ वस्तू गिफ्ट करून द्या स्पेशल सरप्राईज

Karva Chauth 2021 : सौभाग्याचा सण म्हणजे करवा चौथ यंदाच्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतोय. या दिवसासाठी केवळ पत्नीनाच टिप्सची गरज नसते, तर हा दिवस आणखी स्पेशल बनवण्याची मोठी जबाबदारी पतींवर सुद्धा असते. म्हणूनच या टिप्स तुमच्या उपयोगाच्या ठरतील…

karwa-chauth-1200
(Photo: File Photo)

सौभाग्याचा सण म्हणजे करवा चौथ यंदाच्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतोय. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला, या दिवशी स्त्रिया पतीच्या दिर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करवा चौथचा व्रत करतात. या दिवशी पतीकडून पत्नीला गिफ्ट देण्याची एक प्रथा असते. हा दिवस साजरा करण्यासाठी केवळ पत्नीनाच टिप्सची गरज नसते, तर हा दिवस आणखी स्पेशल बनवण्याची मोठी जबाबदारी पतींवर सुद्धा असते. जर करवा चौथच्या सायंकाळी तुमच्या पत्नीना काय गिफ्ट देऊ असा काही विचार करत असाल तर इथे तिथे शोधाशोध करण्यापेक्षा या टिप्स तुमच्या उपयोगाच्या ठरतील…

व्हिडीओमध्ये कैद करा तुमच्या नात्याचा प्रवास

तुमच्या नात्याची सुंदर अशी लव स्टोरी किंवा मग आतापर्यंत तुमच्या नात्यांचा प्रेमळ प्रवास तुमच्या व्हिडीओमध्ये कैद करू शकता. त्याऐवजी तुम्ही एकमेकांसोबतचे फोटो एकत्र करत त्यावर एक व्हिडीओ बनवू शकता. यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोर वर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अॅप सुद्धा मिळतील. या अॅप वर तुम्ही दोघांच्या ही आयुष्यातील खास क्षण एकत्र करत अगदी एखाद्या फिल्म पाहतो त्याप्रमाणे तुमच्या नात्याचा प्रवास अनुभवू शकता.

प्रोफेशनल फोटोशूट

आपल्या बिझी शेड्यूलमध्ये पती-पत्नी एकमेकांना वेळ देण्यास विसरून जातात.असं असेल तर आजचा करवा चौथचा दिवस तुम्ही खूप खास बनवू शकता. तुमचं पत्नीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी हाच योग्य दिवस आहे. तुमच्या पत्नीसोबत एक प्रोफेशनल रोमँटिक फोटोशूट करू शकता. जर तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरा आहे, तर तुमच्या कुटुंबाचे सदस्य किंवा मित्र तुम्हाला मदत करू शकतात.

पत्नीची आवड पाहून द्या गिफ्ट्स

तुमची पत्नीची आवड काय आहे हे तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल. त्यामुळे तुमच्या पत्नीला काय आवडेल हा विचार करून त्यांच्या आवडीच्या गोष्टी उदा. ज्वेलरी, फोटो, पर्स, चॉकलेट अशा गोष्टी गिफ्ट करून सुद्धा तुम्ही तुमच्या पत्नीला स्पेशल फिल देऊ शकता.

रोमॅण्टिक लेटर

आपल्यापैकी अनेकजण असेही आहेत की त्यांनी आपल्या जोडीदाराबाबत मनात असलेलं प्रेम अजुनही व्यक्त केलं नसेल. अशा व्यक्तींनी करवा चौथचं निमित्त साधत या दिवशी तुम्ही तुमच्या पत्नीसाठी एक रोमॅण्टिक लेटर सुद्धा लिहू शकता. हे रोमॅण्टिक लेटर वाचून तुमच्या पत्नीला खूप चांगल्या वाईब्स मिळतील. तसंच जर तुम्हाला व्यक्त होणं कठीण जात असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

रोमॅण्टिक डिनर डेट

दिवसभर उपवास केल्यानंतर पत्नीने स्वयंपाकघरात तुमच्यासाठी काहीतरी खास बनवण्याची तयारीही केली असेल, म्हणून पत्नीला सांगा की आज आपण बाहेर जेवायला जाऊया आणि तिला रोमँटिक डिनर डेटवर घेऊन जा. दररोज तेच तेच आयुष्य जगत असताना पत्नीला थोडं वेगळं वातावरण ते ही तुमच्यासोबत काही प्रेमळ क्षण घालवता येतील.

रात्रीचे जेवण स्वतः बनवा

जर तुम्हाला स्वयंपाकाची थोडी आवड असेल तर तुम्ही आजचा दिवस आणखी खास बनवू शकता. यूट्यूबवर एक चवदार रेसिपी शोधा आणि आज तुमचे आजचे रात्रीचे जेवण स्वतः बनवा. आपल्यासाठी आपल्या पतीने स्वतःच्या हाताने जेवण बनवलंय ही भावनाच तुमच्या पत्नीला खूप आवडेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karva chauth romantic gifts ideas for wife have a look on these beautiful gifts prp

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या