scorecardresearch

Karwa Chauth 2021 Moonrise Time: तुम्ही चंद्राची प्रतिक्षा करताय का ? तुमच्या शहरात चंद्र कधी दिसेल ते जाणून घ्या

असं मानलं जातं की करवा चौथच्या दिवशी देवी पार्वतीची पूजा केल्यास अखंड सौभाग्यवतीचं वरदान मिळतं. करवा चौथच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिला चंद्रोदयानंतरच उपवास सोडू शकतात. तुमच्या शहरात चंद्रोदयाची काय वेळ आहे, जाणून घेऊयात…

Karwa Chauth 2021 Moonrise Time: तुम्ही चंद्राची प्रतिक्षा करताय का ? तुमच्या शहरात चंद्र कधी दिसेल ते जाणून घ्या

Karwa Chauth 2021 Moonrise Time Today, Chand Nikalne Ka Samay Today/ Tonight Live Updates: हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला करवा चौथ साजरा केला जातो. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी संपूर्ण दिवस उपवास करतात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. असं मानलं जातं की करवा चौथच्या दिवशी देवी पार्वतीची पूजा केल्यास अखंड सौभाग्यवतीचं वरदान मिळतं. करवा चौथच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिला चंद्रोदयानंतरच उपवास सोडू शकतात.

करवा चौथच्या दिवशी चंद्र उगवल्यानंतर चंद्राची पूजा केली जाते. या वेळी स्त्रिया चाळणीत दिवा ठेवतात. दिव्याने ठेवलेल्या चाळणीतून चंद्र पाहिल्यानंतर पाणी अर्पण केलं जातं. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर त्या चाळणीतून पतीचे मुख पाहण्याची परंपरा आहे. यानंतर, तिच्या घरातील वडिलांचे आशीर्वाद घेऊन, ती आपल्या पतीच्या हातातून पाणी घेते. सर्व स्त्रिया करवा चौथच्या दिवशी चंद्र उगवण्याची आतुरतेने वाट पाहतात. चंद्रोदयाची वेळ शहरानुसार बदलते. तुमच्या शहरात करवा चौथचा चंद्र कधी दिसेल ते जाणून घ्या-

करवा चौथच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ (Karwa Chauth Chand Nikalne Ka Time)

१. दिल्ली- ०८:०८ मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Delhi)

२. नोएडा- ०८.०७ मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Noida)
३. मुंबई- ०८.४७ (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Mumbai)
४. लखनौ- ०७:56 मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Lucknow)
५. पाटणा- ०७:४२ मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Patna)
६. जयपूर- ०८: १७ मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Jaipur)
७. अलिगड- ०८:०६ मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Aligarh )
८. आग्रा- ०८:०७ मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time in Delhi)
९. मथुरा- ०८:०८ मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Mathura)
१०. कोलकाता- ०७: ३६ मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Kolkata)
११. देहरादून- ०८:०० (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Dehradun)
१२. बरेली- ०७:५९ मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Bareilly)
१३. गोरखपूर- ०७: ४७ मिनिटे (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Gorakhpur)
१४: बंगळुरू: रात्री ०८: ३९ (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Bengaluru)
१५. फर्रुखाबाद- ०८: ०१ (Karwa Chauth 2021 Moonrise Time In Farrukhabad)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 18:34 IST

संबंधित बातम्या