scorecardresearch

रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवणं म्हणजे आजारांना आमंत्रण! पीठ मळल्यावर किती वेळाने वापरावं?

Kitchen Hacks Failed: वेळ वाचवणे हे एका स्मार्ट गृहिणीचे लक्षण आहे यात दुमत नाही. पण वेळ वाचवण्यासाठी तुम्हीही रात्रीच्या वेळी पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवत असाल तर मात्र आजच थांबा.

रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवणं म्हणजे आजारांना आमंत्रण! पीठ मळल्यावर किती वेळाने वापरावं?
पीठ मळल्यावर किती वेळाने वापरावं? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Side Effects Kneaded Dough Kept In Fridge: सकाळी कामाला जाण्याची घाई असताना डबा बनवणे हेच मोठे टास्क असते, एक दिवस जरी टिफिन नेला नाही तरी आरामात २००- ३०० रुपयांना फोडणी पडते. अशावेळी गृहिणी सुद्धा रात्रीच पीठ मळून ठेवतात. वेळ वाचवणे हे एका स्मार्ट गृहिणीचे लक्षण आहे यात दुमत नाही. पण वेळ वाचवण्यासाठी तुम्हीही रात्रीच्या वेळी पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवत असाल तर मात्र आजच थांबा. आज आपण आहारतज्ज्ञांकडून पोळ्यांचे पीठ नक्की किती तासांनंतर पर्यंत वापरले जावे व त्याचे आरोग्यावर नेमके कसे परिणाम होतात हे जाणून घेणार आहोत.

हे तर आपणही जाणून आहात की फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांचे पोषण सत्व हे थंड तापमानात निघून जाऊ शकते. आयुर्वेदिक तज्ज्ञ राजीव दीक्षित यांच्या माहितीनुसार शिळ्या पिठाच्या पोळ्या खाणे हे तुमच्या शरीरासाठी विषाप्रमाणे काम करू शकते. यामुळे केवळ आपलं पोटच नव्हे तर संपूर्ण आरोग्य बिघडू शकतं. आता मुख्य प्रश्न म्हणजे शिळं पीठ म्हणजे काय? साधारण ७ ते ८ तासानंतर कुठलाही पदार्थ हा शिळा आहे असे मानले जाते. काही काही महिला तर पार दोन दोन दिवस फ्रीजमध्ये पीठ ठेवतात आणि मग वापरतात.

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर प्रताप चौहान यांच्या माहितीनुसार, फ्रीजमध्ये पीठ ठेवल्यावर काही वेळाने यातील माइक्रोन्यूट्रिएंट क्षमता कमी होऊ शकते. यामुळे मूळ पोषण वगळता आपल्या शरीरात केवळ फॅट्सच जात असतात. यामुळे बहुतांश वेळ पीठ आंबटही होऊ शकते. याचे कारण म्हणजे फ्रीजमध्ये जरी तुम्ही झाकून पीठ ठेवलं तरी काही प्रमाणात अन्य पदार्थ, भाज्या यामुळे तयार झालेली हवा त्या पिठाला सुद्धा लागते व तिथे त्याची आंबण्याची प्रक्रिया सुरु होते. असे पीठ पोटात गेल्यास अपचन, गॅस, मळमळ असे त्रास होऊ शकतात.

हे ही वाचा<< युरिक ऍसिड वाढून उठता बसता पायांना होतो त्रास; दिवसभरात ‘हे’ ५ उपाय देऊ शकतात झटक्यात आराम

पीठ मळल्यावर किती वेळात वापरणे आहे योग्य? (How long dough is useful for health)

आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात शक्य असेल तेवढे ताजे अन्न पोटात जाऊदे. त्यामुळे २० ते २५ मिनिटांचा वेळ सोडल्यास त्याहून अधिक काळ पीठ ठेवू नये. फ्रीजमध्ये तर अजिबातच ठेवू नये. ताज्या मळलेल्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने पचनासह डायबिटीज, रक्तदाब असेही त्रास नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 17:24 IST

संबंधित बातम्या