kidney decease: किडनीच्या समस्या या एका रात्रीत विकसित होत नाहीत. वाईट आहार आणि बिघडणारी जीवनशैली या बाबी किडनीशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतात. किडनीशी संबंधित आजारांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात किडनीतील दगड, किडनी निकामी होणे, किडनीला सूज येणे, नेफ्रॉटिक सिंड्रोम यांचा समावेश होतो. त्यामध्ये किडनीतून मूत्रमार्गे जास्त प्रमाणात प्रथिने बाहेर टाकली जातात. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे होणारे मूत्रमार्गाचे संक्रमण आणि यूटीआयशी संबंधित पॉलीसिस्टिक किडनीचा आजार या अशा समस्या आहेत, ज्या वर्षानुवर्षे विकसित होतात. किडनीशी संबंधित सर्व आजारांमध्ये पहिला होणारा बदल म्हणजे मूत्रातील बदल. कारण- किडनीचे मुख्य कार्य शरीरातील कचरा मूत्राद्वारे काढून टाकणे आहे. म्हणून जेव्हा किडनीच्या कार्यावर परिणाम होतो तेव्हा त्याचा परिणाम प्रथम मूत्रावर होतो.

जर किडनीचा आजार असेल, तर लघवीचा रंग हलका गुलाबी, गडद पिवळा, तपकिरी किंवा लघवी फेसासारखी होतो. काही समस्यांमध्ये जर लघवीमध्ये रक्त आले, तर त्याचा रंग गुलाबी किंवा लाल दिसतो. किडनीच्या समस्या असल्यास, लघवी करताना जळजळ होणे, लघवीमध्ये फेस येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा वाढणे, असे अनुभव येऊ शकतात.

हेल्थलाइनच्या मते, आपण अनेकदा किडनी निकामी होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे नंतर समस्या निर्माण होतात. क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) सुरुवातीला शांतपणे वाढतो, परंतु जर सुरुवातीच्या धोक्याची लक्षणे वेळेत ओळखली गेली, तर हा आजार वाढण्यापासून रोखता येतो. किडनीचा त्रास झाल्यावर शरीरात कोणते बदल दिसून येतात ते जाणून घेऊया.

सतत थकवा आणि अशक्तपणा

जेव्हा किडनी बिघडते तेव्हा रक्तात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात, ज्यामुळे शरीरातील उर्जेच्या पातळीवर परिणाम होतो. अशक्तपणा म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता ज्यामुळे व्यक्तीला नेहमी थकवा जाणवतो. किडनीचा त्रास झाल्यास मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. एकाग्रता कमी होऊ लागते आणि चालताना श्वास घेण्यास त्रास होतो. जर रोगाची लक्षणे योग्य वेळी ओळखली गेली, तर डायलिसीस किंवा किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता राहणार नाही.

लघवीच्या सवयींमध्ये बदल

जेव्हा किडनीचा आजार सुरू होतो, तेव्हा अनेकदा लघवीचे प्रमाण, रंग किंवा स्वरूप बदलते, जे लोक गांभीर्याने घेत नाहीत. रात्री वारंवार लघवी होणे, फेसयुक्त लघवी, लघवीत रक्त येणे, लघवीचा रंग खूप गडद असणे, ही सर्व किडनी निकामी होण्याची लक्षणे असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार वाढतो.

पाय, घोटे किंवा चेहऱ्यावर सूज येणे

जेव्हा किडनी शरीरातून अतिरिक्त सोडियम आणि द्रव काढून टाकू शकत नाहीत तेव्हा सूज (एडेमा) येते. ही सूज विशेषतः पाय, घोटे आणि डोळ्यांभोवती येते. लोक बहुतेकदा ते खाण्याच्या वाईट सवयींमुळे किंवा जास्त वेळ उभे राहिल्यामुळे होते असे मानतात. परंतु, ते किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकते. वेळेवर तपासणी करून घेणे आणि ओळखणे महत्त्वाचे आहे.

सतत खाज सुटणे आणि त्वचेत बदल होणे

किडनी निकामी होणे हा एक आजार आहे, जो सहज ओळखता येत नाही; परंतु जर तुम्ही त्याची काही लक्षणे समजून घेतली आणि चाचणी केली, तर तुम्हाला हा आजार लवकर कळू शकतो. सतत त्वचेला खाज येणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. रक्तातील विषारी पदार्थांचे संचय आणि कॅल्शियम आणि फॉस्फरससारख्या खनिजांच्या असंतुलनामुळे त्वचेला खाज येते. जर तुमची त्वचा कोरडी, चपळ झाली आणि कोणत्याही त्वचेच्या अ‍ॅलर्जी किंवा आजाराशिवाय खाज सुटत राहिली, तर ते हलक्यात घेऊ नका. मग तुमच्या किडनीची तपासणी करा.

भूक न लागणे, तोंडात धातूची चव किंवा मळमळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा किडनी योग्यरीत्या कार्य करत नाहीत, तेव्हा शरीरात युरेमिक विषारी पदार्थ जमा होऊ लागतात, ज्यामुळे तोंडात धातूची चव, श्वासाची दुर्गंधी, मळमळ व भूक न लागणे असे त्रास होतात. बऱ्याचदा याकडे पचनाच्या समस्या म्हणून दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे योग्य उपचारांना विलंब होतो. शरीरातील या बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित उपचार घ्या.