Child Sleep Night: लहान मुले रात्री झोपताना अनेकदा खूप त्रास देतात. अशा परिस्थितीत मुलांना झोपवणं हे अनेकदा पालकांसाठी एक कठीण काम होऊन बसतं. जर मुलांना दररोज एकाच वेळी झोपवलं नाही, तर त्यांच्या झोपण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण होते. त्यासाठी काही उपायांचा अवलंब केल्यास तुमच्यासमोर उद् भवलेल्या समस्यांची उत्तरे तुम्हाला मिळू शकतात. ते उपाय काय ते आपण पाहू..

झोपण्यापूर्वी टीव्ही, मोबाईल बंद करा

तुमच्या मुलांना रात्री योग्य वेळी झोपवण्यासाठी, त्यांना झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाईल अथवा टॅबलेट यांसारख्या स्क्रीन कमीत कमी एक तास आधी बंद करा. बऱ्याचदा जास्त वेळा या गोष्टी पाहिल्याने मुलांचा मेंदू सक्रिय होतो, ज्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप येत नाही.

झोपण्याची वेळ निश्चित करा

मुलांना झोपवण्यासाठी एक निश्चित दिनक्रम बनवा. दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. खरं तर, नियमित दिनचर्या शरीराचे घड्याळ निश्चित करते, ज्यामुळे उत्साह वाढतो आणि त्यांच्यात नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होते.

झोपण्यापूर्वी शांत वातावरण तयार करा

मुलांना झोपवण्यापूर्वी खोलीतील दिवे मंद करा. टीव्ही, मोबाईल किंवा टॅबलेट यांसारखी स्क्रीनसदृश उपकरणांच्या प्रकाशामुळेही डोळ्यांना त्रास होतो आणि ती झोपेत व्यत्यय निर्माण करतात. तेव्हा ती झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी बंद करा. त्यामुळे खोलीतील वातावरण शांत व आरामदायी होईल आणि तुमची मुले आरामात झोपू शकतील.

मुलांना गोष्टी सांगा किंवा अंगाई गा

तुम्ही रात्री मुलांना झोपवताना प्रेरणादायी कथा सांगू शकता किंवा अंगाई गीत गाऊ शकता. त्यामुळे त्यांना लवकर आणि चांगली झोप येण्यास मदत होईल. तसेच त्यांचे विचारही सकारात्मक होण्यास मदत होईल.

खाण्यावर नियंत्रण ठेवा

रात्रीच्या खाण्यावर अधिक नियंत्रण ठेवा. मुले रात्रीच्या वेळी चॉकलेट किंवा आइस्क्रीम असे गोड पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. अशा पदार्थांचे रात्री सेवन केल्याने झोपेत खूप अडथळा येतो.