Kitchen Hacks: कोथिंबीर आपल्या रोजच्या आहारातील एक महत्वाचा घटक आहे. मसालेदार भाजी किंवा इतर अनेक गरमागरम पदार्थांवर कोथिंबीर भुरभुरून घातली तर पदार्थाची चव आणखी वाढते. त्यामुळे रुचकर, स्वादिष्ट जेवणासाठी हिरवी कोथिंबीर अतिशय फायदेशीर असते. दरम्यान, हिवाळ्यात कोथिंबीर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे अवघ्या १० रुपयांत आपण बाजारातून कोथिंबीरची मोठी जुडी विकत आणतो. पण, ती साफ करून फ्रीजमध्ये व्यवस्थित न ठेवल्यास अवघ्या दोन दिवसांत सडून खराब होते. अशावेळी ती टाकून देण्याशिवाय पर्याय उरत नाही; त्यामुळे कोंथिबीर जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स-
१) कोथिंबीर नीट कापून स्टोर करा : कोथिंबीर जास्त दिवस ताजी, हिरवीगार ठेवण्यासाठी ती नीट कापून हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे कोथिंबीरचे शेल्फ लाइफ वाढेल. कोथिंबीरची मुळं कापून टाका, त्यानंतर धुवून नीट वाळवा. आता तुमच्या पद्धतीने ती कट करून घ्या. यानंतर कट केलेली कोथिंबीर हवाबंद डब्यात ठेवा. अशा प्रकारे कोथिंबीर दोन आठवडे ताजी राहू शकते.
ऑनलाइन मोबाइल खरेदी करण्यापूर्वी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच; तुम्हालाही लागू शकतो हजारो रुपयांचा चुना
२) झिप-लॉक बॅग वापरा : कोथिंबीर हिरवीगार ठेवण्याची सोप्पी ट्रिक म्हणजे ती झिप लॉक बॅगमध्ये ठेवणे. जर तुमच्याकडे झिप-लॉक बॅग नसेल तर ती पटकन विकत घेऊ शकता. सर्वप्रथम कोथिंबीर धुवून तिची मुळं कापून टाका. कोथिंबीरच्या पानांवरील पाणी पूर्णपणे निघाले की, ती व्यवस्थितपणे झिप-लॉक बॅगमध्ये भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
३) क्लिंग फिल्म वापरा : कोथिंबीर ताजी ठेवण्याची आणखी एक सोप्पी ट्रिक म्हणजे ती क्लिंग रॅपमध्ये गुंडाळणे. कोथिंबीर कोमेजू नये यासाठी क्लिंग फिल्म वापरा. त्यात कोथिंबीर गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने कोथिंबीर आठवडाभर ताजी, टवटवीत राहते.
४) प्लास्टिकच्या डब्यात ठेवा : कोथिंबीर खरेदी केल्यानंतर तिची मुळं कापून टाका आणि त्यानंतर स्वच्छ करा, आता कोथिंबिरीची पानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका कापडावर सुकत टाका. कोथिंबीरमधील पाणी सुकल्यानंतर स्वच्छ प्लास्टिकच्या डब्यात ठेवा आणि टिश्यू पेपरने झाकून झाकण बंद करा. अशा प्रकारे कोथिंबीर दोन आठवडे हिरवीगार राहू शकते.
५) पाण्यात भिजवा : कोथिंबीर ताजी ठेवण्याची आणखी एक ट्रिक म्हणजे ती स्वच्छ करून पाण्यात भिजवणे. यासाठी एक ग्लास अर्धा पाण्याने भरा आणि कोथिंबीर मुळापासून ग्लासमध्ये टाका. दररोज पाणी बदला आणि ग्लास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. या पद्धतीने कोथिंबीर तीन आठवडे ताजी ठेऊ शकता.