हिवाळा हा ऋतू अनेकांना आवडतो. हिवाळ्यातील गुलाबी थंडी अनेकांना हवीहवीशी वाटते पण स्वयंपाक घरात काम करणाऱ्यांना विचारल उत्तर मात्र वेगळे असू शकते. कारण हिवाळ्यात कडक्याच्या थंडीमध्ये गार पाणी वापरून काम करणे फार अवघड असते. हिवाळ्यात पाणी इतके थंड असते ती त्यात काही वेळ हात टाकला तर हात बधीर झाल्यासारखा वाटतो. इतके थंड पाण्यात धुणे-भांडी, स्वयंपाकासह इतर काम करावीच लागतात जे फार अवघड असते. स्वयंपाक करताना एक काम असे असते ज्यासाठी आपल्याला पाण्यात हात टाकावा लागतो ते म्हणजे कणीक मळणे. कडक्याच्या थंडीत पाण्यात हात न टाकता कणीक मळणे तसे थोडे किचकट काम आहे. अनेकांच्या घराता मिक्सरमध्ये कणीक मळण्याचे यंत्र असते पण प्रत्येकाकडे ते असेलच असे नाही. ज्यांच्याकडे कणीक मळण्याचे यंत्र नाही त्यांच्यासाठी पाण्यात किंवा पीठात हात न टाकता कणीक मळण्याचा जुगाड आमच्याकडे आहे.
तुम्ही म्हणाल पाण्यात आणि पीठात हात न टाकता कणीक कशी मळणार? ते कसे शक्य आहे? तीच तर गमंत आहे ना. आपल्याकडे प्रत्येक समस्येवर काहींना काही जुगाड हा असतो ज्यामुळे आपले काम आणखी सोपे होते. अनेकांना पीठात हात टाकून कणीक मळायला आवडत नाही किंवा येत नाही अशा लोकांसाठी हा जुगाड उत्तम आहे. तुमच्या हाताला काही जखम असेल तर ही ट्रिक वापरू शकता. पीठात हात न टाकता कणीश कशी मळावी याची सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगतो.
हेही वाचा – कांद्यामध्ये ‘हे’ तेल टाकून पेटवा वात? भन्नाट ट्रिक वापरून पाहा, मच्छर, पाल आणि उंदरांपासून मिळू शकते सुटका
हेही वाचा – पाणी वापरून बनवा तूप! विश्वास बसत नाहीये मग ‘ही’ सोपी ट्रिक एकदा वापरून बघा; पाहा Viral Video
युट्यूबवर ही ट्रिक Pooja ki rasoighar नावाच्या चॅनलवर सांगितली आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पाण्यात किंवा पीठात हात न टाकता पीठ कसे मळावे. सुरवातीला एक वाटी पीठ चाळून घ्या. त्यानंतर एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये (तेला, तूपाची पिशवी) एक वाटी पीठ टाका, थोडेसे मीठ टाका आणि हळू हळू त्यात मीठ टाका. आता प्लास्टिकच्या पिशवीचे तोडं हाताने बंद करा आणि एखादा ग्लास किंवा वाटी घेऊन पिशवीवर दाब द्या. सर्व बाजूने दाब द्या. गरजेनुसार त्यात पाणी टाका. थोड्यावेळाने तुमचे पीठ आणि पाणी एकत्र होऊन चांगले पीठ मळले जाईल. तयार पीठाच्या गरमा गरम पोळ्या करून खा. ही ट्रिक उपयूक्त आहे की नाही हे स्वत: वापरून पाहा.
(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)