कांदा ही अशी वस्तू आहे ज्याचा वापर जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्या बनवताना केला जातो.अनेक जण कांद्याला सॅलड म्हणून सुद्धा खातात. अनेकदा कांद्याचे भाव वाढतात अशात कांदा विकत घेणे परवडत नाही. अनेक जण दोन तीन महिने साठवला जाईल इतका कांदा विकत घेतात पण आज आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही वर्षभर कांदा साठवू शकता.

  • जेव्हा तुम्हाला वाटेल की कांद्याचे भाव घसरले आहेत तेव्हा लगेच जास्तीत जास्त कांदा विकत घ्या जो वर्षभर तुम्हाला पुरेल. वर्षभर कांदा साठवण्यासाठी सुरुवातीला कांदा सोलून घ्या. त्यानंतर लांब आकाराचा कांदा कापून घ्या, सर्व कांदे कापल्यानंतर हाताने क्रश करा. यामुळे सर्व कांदे वेगवेगळे होणार.
  • त्यानंतर एका कढईत कापलेले कांदे टाका आणि त्यावर तेल टाका आणि गॅसवर ही कढई ठेवा. कमी आचेवर कांदा चांगला शिजवून घ्या.
  • या दरम्यान कांदा अधून मधून परतून घ्या. कांदा गुलाबी होताना दिसेल. नीट लक्ष देऊन कांदा परतून घ्या. कांदा जळू नये, याची काळजी घ्यावी.
  • जेव्हा कांदा सोनेरी रंगाचा होईल, तेव्हा कांदा कढईतून काढा आणि एका प्लेटमध्ये ठेवा.
  • त्यानंतर कांद्यातून तेल पूर्णपणे काढून घ्या. हा कांदा तुम्ही केव्हाही वापरू शकता. तुम्हाला जेव्हा भाजी, पुलाव बनवायचा असेल तेव्हा तुम्ही हा कांदा फोडणीमध्ये वापरू शकता.
  • तुम्ही एक किंवा दिड किलो कांदा फ्राय करुन साठवू शकता. तुम्ही या कांद्याला एका डब्ब्यात भरुन फ्रिजमध्ये सुद्धा ठेवू शकता..

हेही वाचा : Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी कोणता आहार योग्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

कांदा साठवण्याची आणखी एक ट्रिक जाणून घ्या

सुरुवातीला कांदे सोलून घ्या. त्यानंतर लांब आकाराचे कांदे कापा. एका मोठ्या प्लेटमध्ये कापलेले कांदे पसरून घ्या आणि सुती कापडाने झाकून घ्या. ही सुती कापडाने झाकलेली प्लेट पाच दिवस उन्हात ठेवा. हे वाळलेले कांदे मिक्सरमध्ये बारीक करा आणि या पावडरचा उपयोग तुम्ही भाजी बनवताना वर्षभर करू शकता.

या टिप्स नेहमी लक्षात ठेवा

बटाटा आणि कांदा कधीही एकत्र ठेवू नका.
कांदा नेहमी थंड, कोरड्या आणि मोकळ्या जागी ठेवावा.
कच्च्या कांद्यांना कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका.
कांद्याना नेहमी लसूणबरोबर स्टोअर करा.
कांदे नेहमी स्वच्छ ठेवा. कापलेले कांदे नेहमी वेगळे ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)