Kitchen Jugaad Video: झुरळ पाहून अनेकांची तारांबळ उडते. पूर्वी असं होतं की, केवळ पावसाळ्यात घरात झुरळ अधिक व्हायचेत. मात्र, आता तसं राहिलं नाही. आता घरात कधीही झुरळ होतात. आपल्या घरात अनेकदा अस्वच्छतेमुळे झुरळे येतात. या झुरळांमुळे फक्त संसर्गच नाही तर अनेक प्रकारचे आजार होतात. यासाठी या झुरळांपासून लवकर सुटका होणे गरजेचे आहे. आता झुरळांची काळजी करण्याची गरज नाही कारण एका महिलेने झुरळांना कायमचे दूर पळवण्यासाठीचा एक भन्नाट जुगाड दाखविला आहे.

गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. दरम्यान असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या महिलेने झुरळ पळवण्यासाठी चक्क साखरेचा वापर केला आहे, हे वाचून तुम्हीही विचारात पडले असेल ना. कारण ज्या ठिकाणी साखर दिसली तिथे पटकन मुंग्या, झुरळ येतात, मग साखरेचा वापर करुन कसं काय आपल्याला झुरळ पळविता येईल, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, चला तर मग महिलेने दाखविलेला जुगाड आपण पाहूया…

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

नेमकं काय करायचं? 

व्हिडिओत दाखवल्यानुसार, महिलेने एक बाऊल घेऊन त्यात गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर महिलेने त्यात १ चमच साखर घेतलं आहे आणि त्यामध्ये दीड चमचा बोरिक अॅसिड टाकलं आहे आणि त्यात थोडं पाणी टाकून हे सर्व मिश्रण महिलेने एकत्र केलं आहे आणि या मिश्रणाचे गोळे तयार करुन हे गोळे घरातील कोपऱ्यात ठेवा, असं सांगितलं आहे, या उपायामुळे तुमच्या घरातील झुरळांना कायमचे दूर पळविता येईल, असा दावा महिलेने केला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

Madhuris creative world या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)