Kitchen Jugaad Video:  गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा किचन सिंक आणि तांदळाचा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. किचन सिंकमध्ये आपण काही ना काही टाकत असतो. विशेषतः तेलकट पाणी वगैरे. यामुळे सिंक चिकट, अस्वच्छ होतं. त्यावर डागही पडतात. सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साबण किंवा डिटर्जंट किंवा एखादं लिक्विड वापरत असाल. पण ते वापरूनही किचन सिंक साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ते सहजासहजी स्वच्छ होत नाही. पण हा जुगाड ट्राय करुन फक्त एक चमचा तांदूळ वापरून काही मिनिटांतच आणि फार मेहनत न घेता सिंक साफ चकाचक होईल.

या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. Taste of Home युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

आता तांदळाचा वापर करून किचन सिंक कसे चकाचक करायचे ते पाहुयात

यासाठी तुम्हाला फक्त एक छोटा चमचा तांदळाची गरज आहे. एक चमचा तांदूळ घ्या आणि तो किचन सिंकमध्ये पसरवा. यानंतर स्क्रब घ्या आणि त्याच्या मदतीने किचन सिंकमध्ये पसरवलेले तांदूळ सिंकमध्ये घासा. आता यावर पाणी टाकून स्वच्छ करून घ्या. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर किचन सिंक आधी खूप खराब दिसत होता. पण जसं तांदळाने तो घासला तसा तो चमकू लागला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: फक्त ५ मिनिटांत फुगा सोलून देईल ढिगभर लसूण, कसं ते पाहा VIDEO

तुम्ही अशा पद्धतीने एकदा सिंक स्वच्छ करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)