Steps To Clean The Kadhai: भारतीय स्वयंपाकघरात तांबे, माती, लोखंडी, अॅल्युमिनियम, नॉनस्टिक, स्टील अशा विविध भांड्यांचा जेवण बनवण्यासाठी वापर केला जातो. त्यातील लोखंडी भांड्यातील जेवण पौष्टिक आणि रुचकर लागते, असे म्हटले जाते. त्यामुळे महिला आवर्जून या भांड्यात जेवण बनवतात. लोखंडी भांडे केवळ अन्नाला चवच देत नाही, तर ते आरोग्यासाठीदेखील फायदेशीर मानले जाते. तथापि, जेव्हा काही दिवसांनी लोखंडी भांड्याला गंज येतो आणि तो काळा होतो तेव्हा समस्या उदभवते. जर तुमची लोखंडी भांडी काळी झाली असतील, तर खालील उपायांनी तुम्ही तुमचा तवा काही मिनिटांत न घासता नव्यासारखा चमकवू शकता.
लोखंडी भांड्याला चकाचक करण्यासाठी टिप्स
- गॅसवर एक लोखंडी तवा किंवा कढई ठेवा, त्यात एक कप पाणी घाला आणि ते गरम करा. पाणी उकळू लागल्यावर त्यात एक चमचा बारीक वाटलेली तुरटी पावडर घाला.
- त्यानंतर पाण्यात एक चमचा डिटर्जंट पावडर घाला आणि ती चांगली मिसळून फेस येईपर्यंत पाणी पाच मिनिटे उकळू द्या.
- आता चमच्याच्या मदतीने फेसयुक्त पाणी भांड्यावर पसरवा, जेणेकरून संपूर्ण भांडे डिटर्जंटने भिजलेले राहील. त्यामुळे गंज आणि घाण साफ होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर गॅस बंद करा आणि भांड्याला थोडे थंड होऊ द्या.
- त्यानंतर एका भांड्यात तुरटीचे पाणी घाला आणि स्टीलच्या स्क्रबरने भांडे हलक्या हाताने घासून घ्या. नंतर भांडे स्वच्छ पाण्याने धुवा आणि ते स्वच्छ कापडाने सुकवा.
- भविष्यात लोखंडी भांड्याला गंज लागू नये म्हणून पृष्ठभागावर मोहरीच्या तेलाचा पातळ थर लावा.