Easy Home Remedies for Tawa Cleaning: घराघरांत रोज वापरला जाणारा लोखंडी तवा पोळी, पराठा, डोसा असे अनेक पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. पण, या तव्याची खरी समस्या म्हणजे त्यावर साचणारी काळीकुट्ट तेलकट तवंग. कितीही स्क्रबरने घासलं तरी ती हटत नाही. परिणामी, तवा निस्तेज दिसतो आणि अन्नाची चवही कमी होते. मग असा प्रश्न पडतो की, “हा हट्टी डाग खरंच जाईल का कधी?”
याच प्रश्नाचं उत्तर एका सोप्या, पण भन्नाट देशी नुस्ख्यात दडलंय. फक्त एक रुपयांचा शॅम्पू, थोडं मीठ आणि एक लिंबू. होय, या तीन गोष्टींनी तुम्ही मिनिटांत तव्याला चकचकीत नव्यासारखं करू शकता. पण कसं? हे जाणून घेतल्याशिवाय रहावं का? चला तर मग टप्प्याटप्प्याने पाहू या हा अद्भुत प्रयोग…
पहिला टप्पा – तवा गरम करा
सर्वप्रथम तवा चांगला गरम करून घ्या. गरम झालेल्या तव्यावर एक चमचा मीठ आणि थोडासा शॅम्पू टाका. त्यांना हलकेसे एकत्र करून घ्या. काही क्षणातच तव्यावरील चिकटसर थर हळूहळू निघेल.
दुसरा टप्पा – लिंबाचा जादूई स्पर्श
आता अर्धा ग्लास पाणी ओता आणि त्यात अर्धं कापलेलं लिंबू पिळा. त्याचं सालसुद्धा टाका. चमच्यात लिंबाचं साल फिक्सकरून तव्यावर हळूहळू घासायला सुरुवात करा. काही मिनिटांतच तवा अर्धा स्वच्छ झाल्याचं तुम्हाला दिसेल.
तिसरा टप्पा – पूर्ण सफाई
आता गॅस बंद करून तव्यावर तयार झालेला मिश्रण एका बाऊलमध्ये काढा. स्क्रबरने तवा नीट घासून काढा. काळेकुट्ट डाग गायब. काही क्षणांत तवा एकदम नवीन दिसायला लागेल. शेवटी साध्या पाण्याने धुऊन तो पूर्ण सुकवा.
चौथा टप्पा – जंग लागण्यापासून बचाव
तवा पूर्णपणे कोरडा झाल्यावर त्यावर पातळ थराने तेल चोळा. यामुळे तवा गंजणार नाही आणि जास्त दिवस टिकेल.
शॅम्पू, मीठ आणि लिंबूच का?
शॅम्पूमध्ये असलेले घटक तेलकटपणा तोडून टाकतात. मीठ नैसर्गिक स्क्रबरसारखं काम करतं. तर लिंबातील आम्ल (सिट्रिक अॅसिड) हट्टी डाग काढून टाकतं. शिवाय तवा गरम असल्याने या तिन्ही घटकांची ताकद दुप्पट होते आणि परिणाम चमत्कारिक दिसतो.
येथे पाहा व्हिडीओ
म्हणूनच पुढच्या वेळी तवा काळा पडला की महागड्या क्लिनरकडे न वळता, फक्त एक रुपयाचा शॅम्पू वापरून हा जादूई प्रयोग करून पाहा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)