हृदयविकाराचा झटका हा एक असा आजार आहे, ज्यामुळे सध्या बहुतेक लोकांचा मृत्यू होत आहे. गायक केके यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. त्यांच्या जाण्याने सर्वजण दु:खी होऊन त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. चला तर मग जाणून घेऊया, हृदयविकाराचा झटका का येतो आणि तो टाळण्याचा उपाय काय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृदयविकाराचा झटका का येतो?

शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. वास्तविक, शरीरात कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात. पहिले चांगले आणि दुसरे वाईट. जेव्हा तुमच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते तेव्हा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढू लागते.

मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू

ही आहेत हृदयविकाराची लक्षणे

  • छातीत दुखणे
  • चक्कर येणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • थकवा येणे
  • गॅस होणे

अशा प्रकारे स्वतःचे रक्षण करा

जर तुम्हाला अशी लक्षणे दिसली तर अजिबात उशीर करू नका आणि डॉक्टरांना भेटा, जेणेकरुन त्यावर लवकरात लवकर उपचार करता येतील. अनेक वेळा रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे समजण्यास उशीर होतो, ज्यामुळे त्याचा जीव वाचवणे कठीण होते. अशा परिस्थितीत, लहान लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जेणेकरून ही गंभीर परिस्थिती होण्याआधीच हाताळता येईल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kk dies of heart attack find out exactly what happens during this pvp
First published on: 01-06-2022 at 16:41 IST