काही आठवड्यांपूर्वी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री छवि मित्तलने तिच्या स्तनाच्या कर्करोगबद्दल सांगितले होते. आता महिमा चौधरीने तिच्या स्तनाच्या कर्करोगबद्दल खुलासा केला आहे. महिमा चौधरीची केमोथेरपी झाली, त्यामुळे तिचे सर्व केस गळले आहेत. महिमा चौधरीमुळे पुन्हा एकदा स्तनाच्या कर्करोगबद्दल चर्चा सुरु झाली. या आजाराबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. म्हणूनच स्तनाच्या कर्करोगबद्दल असलेली मिथक आणि तथ्य जाणून घेऊयात तज्ञांकडून.

स्तनाचा कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत, ज्यामुळे आयुष्यातील सर्व काही ठप्प होते.  कॅन्सरशी लढा शारिरीक व मानसिकरित्या दिला गेला पाहिजे. एक सामान्य मिथक अशाप्रकारे आहे की, स्तनाचा कर्करोग केवळ मध्यमवयीन स्त्रियांमध्ये होतो. सत्य हे आहे की, तरुण स्त्रियाना आणि पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. एक अतिशय सामान्य समज अशी आहे की, जास्त साखर किंवा दुग्ध सेवन केल्याने कर्करोगाच्या पेशींना पोषण मिळते आणि कर्करोग होतो. वस्तुस्थिती अशी आहे की अद्याप असा कोणताही अभ्यास नाही की ज्याने अशी गोष्ट सिद्ध केली आहे. लठ्ठपणामुळे स्तन कर्करोग होण्याची एक शक्यता आहे, परंतु साखर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे कर्करोग होण्यामागे कोणतीही भूमिका नाही.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

इतर काही सामान्य मिथक आणि तथ्ये खालील प्रमाणे आहेत :

• जर तुमच्या कुटुंबामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यास, ते तुमच्या मध्ये देखील देखील विकसित होऊ शकते. याचा अर्थ, स्तनाचा कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ते विकसित होईलच असे नाही.

• स्तनाचा कर्करोग सांसर्गिक आहे! कर्करोग हा एक संप्रेषित (non-communicable) रोग आहे.

• अँटीपर्स्पिरंट्स आणि डीओडोरंट्सचा वापर केल्याने स्तनाचा कर्करोग होतो. हे गृहितक सिद्ध केल्याचा असा कोणताही क्लिनिकल पुरावा नाही.

• तुम्हाला बीआरसीए १ किंवा बीआरसीए २ उत्परिवर्तन असल्यास तुम्हाला स्तनाचा कर्करोग होईल. वरील उत्परिवर्तन झाल्यास स्तनाचा कर्करोग १०० टक्के होईल हे एक मिथक आहे.

• पुरुषांना स्तनाचा कर्करोग होत नाही. त्याचा परिणाम फक्त महिलांवर होतो. स्तनांच्या कर्करोगानेही निदान झालेल्या पुरुषांची अल्प प्रमाण आहे.

• जर आपल्या स्तनामध्ये एक गाठ सापडली तर म्हणजे स्तनाचा कर्करोग असे नाही. सर्वच  गाठी कर्करोगाच्या नसतात, परंतु जर सतत गाठ येणारी असेल, तर ती स्तनांच्या त्वचेत किंवा स्त्राव असलेल्या ऊतकातील बदलांशी संबंधित असू शकते, असे असेल तर डॉक्टरांकडून निश्चितच मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत नैदानिक स्तन तपासणी करणे आवश्यक आहे.

• मेमोग्राम कर्करोगाचा फैलाव करू शकतो – मॅमोग्रामसह रेडिएशन एक्सपोजर केल्याच्या फायद्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. वयाच्या ४० वर्षांनंतर दरवर्षी स्क्रीनिंग मॅमोग्राम करण्याची शिफारस केली जाते.

• दरवर्षी केलेले मॅमोग्राम स्तन कर्करोगाच्या लवकर तपासणीची हमी देतात. हे एक अत्यंत संवेदनशील स्क्रीनिंग साधन आहे, परंतु ते पूर्णपणे खात्रीशीर नाही. त्यात काही चुकीचे नकारात्मक अहवाल आहेत. म्हणूनच स्तन-कर्करोगाच्या लवकर तपासणीचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे स्वत: ची स्तन तपासणी करणे.

• स्तनाच्या कर्करोगामुळे नेहमीच गाठ होते. ही वस्तुस्थिती आहे की बर्याच वेळा गाठ जाणवू शकते किंवा त्याच्या काठावर अनेक गाठ वाढू शकतात. म्हणूनच मेमोग्राम आणि क्लिनिकल स्तन तपासणी महत्वाची आहे.

• लवकर उपचार केलेल्या स्तनाचा कर्करोग पुन्हा होत नाही. सत्य हे आहे की अगदी लवकर निदान केलेल्या कर्करोगात देखील वारंवार पुनरावृत्ती होण्याचा धोका असतो. म्हणूनच आम्ही जवळून पाठपुरावा आणि नियमित परीक्षांवर खूप लक्ष केंद्रित करतो.

• स्तनाच्या कर्करोगाच्या सर्व रूग्णांवर त्याच पद्धतीने उपचार केले जातात. सत्य हे आहे की निदान आणि स्वतंत्र अहवाल आणि जोखीम स्तरांच्या अवलंबून टप्प्यावर उपचार बदलू शकतात. काही घटक म्हणजे आकार, हार्मोन रीसेप्टर स्थिती, हर् २ स्थिती, बीआरसीए १ आणि २ उत्परिवर्तन, ऑन्कोटाइप डीएक्स किंवा मम्माप्रिंट सारख्या पुनरावृत्ती होण्याची शक्यता आणि वैयक्तिक प्राधान्ये.

निष्कर्ष: स्तनाचा कर्करोग हा एक ज्ञात आणि अधिक चर्चिला जाणारा कर्करोग आहे आणि अद्याप त्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. याबद्दल मी काही सारांश देण्याचा प्रयत्न केला आहे. हे खरं आहे की उपचार घेत असलेल्या व्यक्तीसाठी कौटुंबिक आणि हितचिंतकांची बरीच मते आणि सल्ले आहेत परंतु, योग्य परिणामासाठी तुम्ही उपचार घेत असलेल्या डॉक्टरांशी चर्चा करणे नेहमीच योग्य आहे.

( मूळ लेख डॉ. मुकुल रॉयकन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजी, जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांनी लिहेला आहे.)