डोक्यातील कोंडा ही केसांची सर्वात सामान्य समस्या आहे. हिवाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या खूप त्रासदायक असते. थंड आणि कोरड्या हवामानामुळे टाळूमध्ये डँड्रफ फ्लेक्स वाढू लागतात. जर तुम्हालाही डोक्यातील कोंड्यामुळे टाळूला खाज सुटण्याचा त्रास होत असेल, तर आम्ही तुम्हाला अशा नैसर्गिक हेअर मास्कबद्दल सांगत आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या डोक्यातील कोंडापासून सहज सुटका मिळवू शकता.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार सावलिया यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले की, कोंडा हा मालासेझिया ग्लोबोसा या बुरशीमुळे होतो, जो टाळूवरील अतिरिक्त तेलाला तोडतो आणि त्वचेला त्रास देतो.

टाळूची जळजळ टाळण्यासाठी आणि केसांच्या कूपांना बळकट करण्यासाठी आणि केस गळणे रोखण्यासाठी, तज्ज्ञांनी एक सोपा हेअर मास्क शेअर केला आहे. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा हेअर मास्क वापरल्याने हिवाळ्यात कोंडयापासून सहज सुटका होऊ शकते. हे हेअर मास्क केसांना चमकदार आणि निरोगी बनवेल आणि केस गळण्यास प्रतिबंध करेल.

( हे ही वाचा: कांद्याच्या रसाने खरोखरचं केस गळणे थांबतात का? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच)

आयुर्वेदिक अँटी डँड्रफ मास्क कसा तयार करायचा?

साहित्य

  • १ टेबलस्पून दही
  • ५-७ कढीपत्ता ठेचून
  • २ इंच किसलेले आले

हेअर मास्क बनवण्याची पद्धत:

दही, कढीपत्ता आणि आले यांचा मास्क बनवण्यासाठी प्रथम एक वाडगा घ्या आणि सर्व साहित्य एकत्र करा. ही पेस्ट टाळूवर लावण्यापूर्वी ३० मिनिटे बाजूला ठेवा. अर्ध्या तासानंतर हा मास्क टाळूवर लावा. तज्ञांनी सांगितले की जर तुमच्याकडे ताजा कढीपत्ता आणि आले नसेल तर तुम्ही कढीपत्ता पावडर आणि कोरड्या आल्याची पावडर पेस्ट बनवून वापरू शकता. या तीन गोष्टींचा एकत्रित वापर केल्याने कोंडा प्रभावीपणे दूर होतो.

( हे ही वाचा: हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल? फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दही, कढीपत्ता आणि आल्याच्या मास्कचे फायदे

कढीपत्त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि बीटा-कॅरोटीन सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो ज्यामुळे केस मजबूत, लांब, जाड आणि सुंदर होतात. केसांवर आल्याचा वापर केल्याने केस निरोगी होतात आणि केस गळणे थांबते. आल्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम असते जे केस गळण्यास प्रतिबंध करते. केसांवर आल्याचा वापर केल्याने कोंडा दूर होण्यास मदत होते.
प्रथिनेयुक्त दही केसांना घट्ट आणि मजबूत बनवते. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड टाळू स्वच्छ करते, मृत पेशी काढून टाकते आणि केसांच्या कूपांच्या वाढीस मदत करते.