किडनी निकामी झाल्यामुळे माणसाचे आयुष्य खूप बंधनात राहते. त्याला पूर्वीसारखे आयुष्य जगता येत नाही. कारण किडनी हा मानवी शरीरातील अतिशय खास आणि महत्त्वाचा भाग आहे. असे मानले जाते की ते आपल्या शरीरात फिल्टरसारखे कार्य करते. म्हणूनच किडनीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला माहीत आहे का किडनी फेल झाल्यामुळे तुमच्या शरीराच्या कोणत्या भागात वेदना होतात. चला तर मग जाणून घेऊया किडनी निकामी झाल्यामुळे वेदना कुठे होतात आणि किडनी कशी तंदुरुस्त ठेवायची.

एक किडनी असल्यानंतर काळजी घेणे आवश्यक आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किडनी शरीरातील पोटॅशियम, मीठाची पातळी संतुलित करते. याशिवाय, किडनीचे मुख्य काम म्हणजे लाल रक्तपेशी निर्माण करणे. काही कारणास्तव एखाद्या व्यक्तीची किडनी खराब झाली, तर व्यक्ती एका किडनीच्या मदतीने सामान्य जीवन जगू शकते, परंतु त्याला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते.

आणखी वाचा : या ६ उपायांनी केसातील कोंडा बरा होऊ शकतो, पुरुषांसाठीही आहे उपयुक्त

किडनी निकामी होण्याची प्रारंभिक चिन्हे
जर तुमची किडनी खराब होत असेल तर तुम्हाला भूक न लागणे, त्यामुळे वजन कमी होणे, पाय सुजणे आणि त्वचेला कोरडेपणा आणि खाज सुटणे यांचा अनुभव येऊ शकतो. याशिवाय अशक्तपणा आणि थकवा जाणवण्यासोबतच वारंवार लघवी होण्याचीही समस्या उद्भवते.

(टीप: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)