scorecardresearch

Premium

जाणून घ्या दररोज ३० मिनिटे सायकल चालवण्याचे जबरदस्त फायदे

वाढते वजन कमी करण्यासाठी सायकलिंग हा सोपा आणि स्वस्त पर्याय आहे.

सायकल चालविण्याचे फायदे
सायकल चालविण्याचे फायदे (फोटो : freepik)

आपण जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि ते करण्यासाठी जिमिंग तुम्हाला कंटाळवाणे वाटत असेल, तर सायकल चालवणं हा सोपा आणि स्वस्तात मस्त असा पर्याय आहे. जर तुम्ही सकाळ – संध्याकाळ सायकल चालवलात तर तुमचे वजन नियंत्रित राहण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी काही पर्याय जर तुम्ही निवडत असाल तर तुमच्या वर्कआउट प्लॅनमध्ये सायकलिंगचा नक्की समावेश करा. रोज सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकलिंगमुळे कॅलरीज कमी होतात. शिवाय तुमचे फॅट देखील कमी होते. एवढेच नाही तर सकाळी सायकल चालवल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते आणि रात्री झोप चांगली लागते. चला तर मग जाणून घेऊया रोज ३० मिनिटे सायकल चालवण्याचे महत्वाचे फायदे.

BECIL Bharti 2023
मुंबईत नोकरीची मोठी संधी! BECIL अंतर्गत विविध पदांच्या १२९ रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या
Are You using Paper Aluminum Foil for wrapping Roti Sabzi Rice What are Cheap Affordable option To Pack Food FSSAI Warning
कागद, फॉईल किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? FSSAI ने दिली धोक्याची सूचना, तज्ज्ञांनी सांगितले पर्याय
heart disease
Health Special: हृदयरोगाला दूर ठेवण्यासाठी हे नक्की खा
yoga-poses-for-better-sleep
झोप येत नाही मग झोपण्यापूर्वी करा हे ३ आसन, येईल शांत झोप

त्वचेची गुणवत्ता सुधारते

व्यायाम म्हणून सकाळी काही वेळ सायकल चालवल्याने त्वचेला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे तुम्ही त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

रात्रीची चांगली झोप

सकाळी सायकल चालवल्याने शरीराची चांगली क्रिया होते. सायकल चालवताना शरीराच्या हालचालीमुळे थोडावेळ थकवा जाणवतो. परंतु, रात्री चांगली झोप लागते. सायकलिंगमुळे तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असल्याने रात्रीची झोप चांगली होते.

स्मरणशक्ती वाढते

जी लोक सायकल चालवतात त्यांची स्मरणशक्ती सामान्य माणसांपेक्षा जास्त असते. सकाळ – संध्याकाळ नियमित सायकल चालवल्याने मेंदूच्या नवीन पेशी तयार होतात. त्यामुळे सामान्य माणसांपेक्षा सायकलस्वारांच्या मेंदूच्या पेशी अतिशय सक्रिय राहतात.

हृदय निरोगी राहते

सायकल चालवणे ही एक शारीरिक क्रिया आहे, जी हृदय निरोगी ठेवते. नियमित सायकलिंगमुळे हृदय निरोगी राहते. त्याचप्रमाणे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण देखील सुधारते.

वजन कमी होते

तुम्ही जर नियमित सायकल चालवलात तर त्यामुळे तुमचा नियमित व्यायाम देखील होतो. त्याने तुमच्या शरीरातील कॅलरी आणि चरबी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहते आणि वजन वाढत देखील नाही.

फुफ्फुसे मजबूत होतात

सायकल चालवताना तुम्ही जास्त ऑक्सिजन शरीरात घेता. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणही वाढते आणि त्याच वेळी हवा फुफ्फुसात वेगाने आत बाहेर जाते. त्यामुळे फुफ्फुसाची क्षमता देखील सुधारते आणि फुफ्फुस मजबूत होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Learn about the tremendous benefits of cycling for 30 minutes every day gps

First published on: 05-06-2022 at 16:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×