फाल्गुन महिना सुरु झाल्यावर आपल्याला वेध लागतात ते म्हणजे होळीचे. यावर्षी १८ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. संपूर्ण देशात होळी आणि धुलीवंदन साजरे केले जाते. होळी हा सर्वांच्या आवडत्या सणांपैकी एक आहे. वेगवेगळ्या रंगांसोबत केली जाणारी मजामस्ती कोणाला आवडत नाही? परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की होळी नेहमी ‘रंगांचा सण’ म्हणूनच का साजरी केली जाते? होळीला रंग खेळण्याची प्रथा कधीपासून सुरु झाली?

होळी साजरी करताना, मोठ्या आवाजात, ढोल-ताशांच्या गजरात एकमेकांवर वेगवेगळे रंग आणि पाणी फेकले जाते. भारतातील इतर अनेक सणांप्रमाणे, होळी देखील वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. चला तर मग आज आपण होळीतील रंगांचे महत्त्व सविस्तरपणे समजून घेऊया.

VIDEO: पंतच्या सांगण्यावरून रोहित शर्माने घेतला DRS, निकालानंतर अश्विनने शमीसोबत जे केले ते एकदा पहाच…

दोन दिवस हा सण साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. या दिवशी होलिका आणि भक्त प्रल्हादाच्या कथेचे स्मरण करून होलिकेच्या प्रतिमांचे दहन केले जाते. यंदा १७ मार्चला होलिका दहन आहे. दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून धूलिवंदन हा सण साजरा करतात. हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो.

असे मानले जाते की होळी हा रंगांचा सण म्हणून साजरा करण्याची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून झाली. भगवान श्रीकृष्णाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्ण मथुरेत रंगांनी होळी साजरी करायचे आणि तेव्हापासून होळी हा रंगांचा सण म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. ते वृंदावन आणि गोकुळमध्ये मित्रांसोबत होळी खेळायचे. हळूहळू या उत्सवाला सामुदायिक कार्यक्रमाचे स्वरूप आले. हेच कारण आहे की आजही वृंदावनात होळीचा उत्सव अतुलनीय आहे आणि आता जगात सर्वत्र लोक आपापल्या पद्धतीने होळी खेळतात आणि आपापसातील कटुता संपवून मैत्रीपूर्ण राहतात.

करिअरच्या सुरुवातीला आमिर खानला करावे लागले होते ‘हे’ काम; कित्येकदा सहन करावा लागला होता अपमान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होळीबद्दल अशीही एक समजूत आहे की, होळी हा हिवाळ्याला निरोप देणारा वसंत ऋतूचा सण आहे. नवीन पिकाचा साठा भरलेला पाहून शेतकरी आनंदाचा भाग म्हणून होळी साजरी करतात. त्यामुळे होळीला ‘वसंत महोत्सव’ असेही म्हणतात.