कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य त्याच्या सवयी आणि गुणांवरून ओळखता येते. लहानपणापासून जर तुम्ही चांगल्या सवयी लावून घेतल्या, तर तुम्ही भविष्यात आनंदी आणि यशस्वी जीवन जगू शकता. त्यासाठी अनेकदा लहान मुलांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेरणादायी विचार आणि सवयींबद्दल सांगितले जाते. कारण- त्यांचे विचार आणि सवयी तुम्हाला भविष्यात चांगले आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चांगल्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांचे पालन करून तुम्ही सकारात्मक आयुष्य जगू शकता.

महात्मा गांधी यांच्या सात सकारात्मक सवयी बदलतील तुमचे जीवन

१) पायी चालणे

महात्मा गांधीजींना चालण्याची खूप आवड होती. ते खूप चालायचे. सर्व वयोगटांतील लोकांसाठी चालणे हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे; जो संतुलित आहाराबरोबर शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. गांधीजी खूप ‘फिटनेस फ्रिक’ होते. त्यामुळे ते रोज सुमारे १८ किलोमीटर चालायचे आणि ही सवय ते जवळपास ४० व्या वर्षापर्यंत पाळत होते.

abhishek banerjee challenges amit shah
“हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा”, ममता बॅनर्जींच्या पुतण्याचे अमित शाह यांना आव्हान; म्हणाले, “जी व्यक्ती…”
vasai minor girl rape marathi news, minor girl raped twice in vasai marathi news
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोनदा प्रसुती; पहिल्या बाळाची केली विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

२) दारू आणि तंबाखूच्या व्यसनापासून दूर

महात्मा गांधी यांनी चहा, कॉफी किंवा कोक यांपासून दूर राहत नेहमी मध, गरम पाणी, लिंबू या पौष्टिक पेयांना प्राधान्य दिले. दारू, तंबाखू आणि इतर नशा या प्राणघातक आजारांचे मूळ कारण आहेत. त्यामुळे महात्मा गांधींनीही वेळोवेळी या व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

३) शांत राहणे

जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर शांत राहता आले पाहिजे. कारण- शांत व्यक्तीच आयुष्यात त्याच्या ध्येयापर्यंत नीट पोहोचू शकते. त्यात तुम्ही कोणत्या पदावर आहात, किती मोठे आहात हे महत्त्वाचे नाही; पण तुम्ही इतरांशी वागताना नेहमी सभ्य आणि साधेपणाने वागले पाहिजे. कारण- आयुष्य नेहमी एकसारखे नसते.

४) नेहमी खरे बोला

आयुष्यात कितीही संकटे आली तरी नेहमी खरे बोला. कारण- एक खोटे लपवण्यासाठी तुम्हाला हजारदा खोटे बोलावे लागते. त्यामुळे कोणतीही गोष्ट असू दे; ती न घाबरता एकदाच खरी सांगून टाकायची.

५) सकस आहार

महात्मा गांधी नेहमी साधा आणि तितकाच सकस आहार घ्यायचे. जेवणासाठी त्यांच्याकडे एक लहान वाटी होती; ज्यातून ते अन्न घ्यायचे. त्यामुळे त्यांना ते किती प्रमाणात अन्न खातात हे समजायचे. पण, हल्ली आपण जंक फूडच्या इतके आहारी गेलो आहोत की, ते खाताना आपण किती खातोय याचे प्रमाण मोजत नाही. त्यामुळे वजन वाढते. म्हणून निरोगी राहण्यासाठी आता गांधींजींची ही सवय आपण ‘ट्राय’ केली पाहिजे.

६) सकारात्मक राहा

जेव्हा तुम्ही फार सकारात्मक असता तेव्हा तुम्हाला फार कमी ताण येतो आणि मग तुम्ही कोणत्याही समस्येचा चांगल्या प्रकारे सामना करू शकता. त्यामुळे नेहमी नकारात्मक विचार करीत ताण घेऊ नका. अशा वेळी तुम्ही ध्यान केल्यास सकारात्मक राहू शकता; तसेच तुमचे मन शांत व तणावमुक्त राहण्यास मदत होते.

हेही वाचा – Gandhi Jayanti 2023 : देशभरात कशी साजरी केला जाते गांधी जयंती? जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व आणि इतिहास

७) पर्यावरणाचे रक्षण करा

नव्या पिढीसमोर पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास ही एक मोठी समस्या आहे. पण, महात्मा गांधी यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले. चांगल्या वातावरणासाठी प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी दिली.