त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर ती निर्जीव आणि कोरडी दिसू लागते. त्वचेवरील ग्लो हरवल्यासारखं वाटतं. त्यामुळे चेहऱ्यावरील गेलेले तेज पुन्हा मिळवण्यासाठी महिला महिन्याला पार्लरमध्ये खूप पैसे खर्च करतात. परंतु, या पैशांची बचत करुन तुम्ही त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेण्याच्या काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही चेहऱ्यावर नेहमी ग्लो राहू शकतोच शिवाय तुमचे पार्लरमध्ये खर्च होणाऱ्या पैशांची बचत देखील होऊ शकते.

नोकरदार महिलांनी कशी घ्यावी त्वचेची काळजी?

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर

नोकरीसाठी घराबाहेर जाणाऱ्या महिलांच्या त्वचेवर सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणाबरोबरच तणावाचा परिणाम होतो. दिवसभराचा थकवाही चेहऱ्यावर दिसू लागतो आणि झोप न मिळाल्याने त्वचाही निर्जीव होते. अशा महिलांसाठी काही अतिशय सोपे घरगुती उपाय आहेत, जे त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यास मदत करु शकतात. तर ते उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊ या.

त्वचा स्वच्छ करा –

फेसवॉशने सकाळी आणि संध्याकाळी त्वचा पूर्णपणे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. जर त्वचा व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर त्वचेवर मृत पेशी जमा होऊ लागतात ज्या त्वचेवरील ग्लो कमी करतात.

स्क्रब

आठवड्यातून एकदा स्क्रब करणं गरडेचं आहे, कारण स्क्रबचा त्वचेवर खूप चांगला परिणाम होतो. स्क्रब त्वचेला एक्सफोलिएट (एक्सफोलिएशन ही तुमच्या त्वचेच्या बाहेरील थरातून मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याची प्रक्रिया आहे.) करते, जी त्वचेतील घाण आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.

हेही वाचा- International Music Day : ‘म्युझिक थेरपी’ म्हणजे काय? या उपचाराच्या मदतीने मानसिक आजार दूर होऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

सनस्क्रीन –

तुम्ही ऑफिसमधील लाईटच्या संपर्कातही येता आणि दिवसातून ३ ते ४ वेळा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात तुमचा चेहरा येतो. अशा परिस्थितीत सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. सनस्क्रीन न लावल्याने टॅनिंग होते आणि कपाळावर आणि गालावर अकाली फ्रिकल्स दिसू लागतात. म्हणूनच सनस्क्रीन लावणे खूप गरजेचे आहे.

फेस पॅक

आठवड्यातून एकदा तरी घरी बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर अवश्य लावा. फेस पॅक बनवणे फार अवघड नाही. तुम्ही घरच्या घरी अप्रतिम फेस पॅक बनवू शकता आणि तो तुमच्या चेहऱ्यावर लावू शकतो. मुलतानी मातीत गुलाबपाणी मिसळून, दह्यात मध घालून, दुधात हळद किंवा कडुनिंब बारीक करूनही तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. यामुळेही त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत असून त्वचे संबंधित अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)