शरिराने लठ्ठ असलेल्या बालकांनी कमी झोप घेतल्यास त्यांना हृद्यविकार, मधुमेह आणि पक्षाघातासारख्या घातक समस्या उद्भवू शकतात असे एका अभ्यातून समोर आले आहे.
मिशीगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, लठ्ठ बालकांनी झोप कमी घेतल्यास त्यांच्यात हृद्यविकाराच्या धोक्याचे प्रमाण वाढते. शरिराने लठ्ठ अशा प्रौढ व्यक्तींबाबत ही समस्या आढळून आली नसल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे. परंतु, लठ्ठ बालकांना याचा सर्वाधिक धोक असल्याचे स्पष्ट झाले आहे. झोपेच्या वेळेत तफावत असल्यास लठ्ठ मुलांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लठ्ठ बालकांना पुरेशी झोप देण्यात यावी असा सल्लाही संशोधकांनी दिला आहे.
मिशीगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ११ ते १७ वयोवर्षामधील एकूण ३७ लठ्ठ बालकांच्या झोपेच्या वेळेबाबतीत सविस्तर अभ्यास केला. यात कमी झोप घेतल्यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि पक्षाघाताच्या समस्या उद्भवल्याचे आढळून आले.