यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो आपला सर्वांत व्यग्र अवयव मानला जातो आणि तो ५०० हून अधिक कार्ये करतो. त्यामध्ये शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढणे, पचनाच्या मदतीसाठी पित्त तयार करणे या कार्यांचा समावेश आहे आणि हे पित्त पोषक तत्त्वांचा साठा करणे आणि निरोगी चयापचय राखणे यांसाठी जबाबदार आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएम), आयसीएमआर व मेयो क्लिनिक यांच्या मते, या महत्त्वाच्या अवयवातील अगदी थोडीशी समस्यादेखील महागात पडू शकते. त्याचा थेट परिणाम आपली हाडे आणि स्नायू यांवर होतो. विशिष्ट वयानंतर लोकांना अचानक त्यांच्या पायांमधी ताकद कमी झाल्याचे जाणवणे हे त्यामागील एक कारण आहे. चला तर मग जाणून घेऊयात, ही लक्षणं नेमकी कोणती आहेत…

जर यकृतामध्ये काही समस्या असेल, तर पायांमध्ये शक्ती कमी होणे, लवकर थकवा येणे, पायांमध्ये वारंवार पेटके येणे, जडपणा जाणवणे, अशी काही लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात. त्याचा अर्थ तुमच्या लिव्हरवरील भार वाढला आहे, असा होतो. WHO आणि राष्ट्रीय पोषण संस्थेच्या मते, विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने यकृताच्या पेशी मजबूत होतात, यकृत स्वच्छ होते आणि रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे पायांना ताकद मिळते. असे काही पदार्थ आहेत की, ज्यांचे दररोज सेवन केल्यास यकृत मजबूत होईल, पायांचे स्नायू मजबूत होतील आणि शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होईल. यकृताचे आरोग्य सुधारू शकणारे काही पदार्थ आपण पाहूया.

बीटाद्वारे उपचार करा तुमच्या यकृतावर

बीटामध्ये हे नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करण्याचा गुणधर्म आहे आणि त्यासाठी ते जगभरात ओळखले जाते. भारतात आयुर्वेदापासून ते आधुनिक औषधांपर्यंत बीट रक्त आणि यकृताच्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते. राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH)च्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बीटरूटमध्ये असलेले बेटेन रंगद्रव्य यकृताच्या पेशींना सक्रिय करते आणि त्यामध्ये जमा झालेले हानिकारक विषाक्त घटक बाहेर काढून टाकते. नियमितपणे बीट खाल्ल्याने रक्त पातळ, स्वच्छ आणि ऑक्सिजनसमृद्ध राहते. जेव्हा रक्त स्वच्छ असते तेव्हा पायांच्या स्नायूंना सर्वांत जास्त फायदा होतो. तुमचे पाय मजबूत करण्यासाठी आणि यकृत सुस्थितीत राखण्यासाठी तुमच्या दैनंदिन आहारात बीटाचा समावेश करा.

हळदीने तुमच्या यकृतावर उपचार करा

भारतात शतकानुशतके हळद ही एक औषधी वनस्पती मानली जाते. तो केवळ एक मसाल्यातील घटक नाही, तर तो एक नैसर्गिक उपायही आहे, ज्याला आयुर्वेदात रामबाण म्हटले गेलेय. आधुनिक विज्ञानदेखील त्याची शक्ती मान्य करते. ‘आयसीएमआर’च्या अहवालात असे सूचित केले गेले आहे की, हळदीतील कर्क्युमिन हे संयुग यकृताची जळजळ कमी करते. जेव्हा यकृताला सूज येते तेव्हा त्याची प्रथिनांचे विघटन करण्याची आणि ती प्रभावीपणे वापरण्याची क्षमता कमी होते. मग त्याचा थेट परिणाम स्नायूंच्या वस्तुमानावर होतो, जे हळूहळू कमकुवत होऊ लागतात आणि त्यामुळे पायांमध्ये अशक्तपणा जाणवू लागतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हळदीची पानंही केवळ यकृतात जळजळ होण्यापासूनच वाचवत नाही, तर त्यातील विषाक्त घटकदेखील काढून टाकतात. याचा अर्थ असा की, शरीरात साचणारे हानिकारक घटक स्नायू आणि हाडांना नुकसान पोहोचवू शकतात. जेव्हा यकृत स्वच्छ आणि हलके असते, तेव्हा रक्तप्रवाह सुधारतो आणि पायांमधील पेशींना पुरेसे पोषण मिळते.

लसूण खा

लसूण हा बहुतेकदा चवीसाठी उपयुक्त मसाला मानला जातो; परंतु वास्तविक ती एक औषधी वनस्पतीही आहे. लसणाचे सेवन यकृताच्या आरोग्याला प्रोत्साहन देते.

एम्सच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, लसणात सक्रिय असलेल्या अ‍ॅलिसिन या संयुगामुळे यकृताच्या कार्याला हातभार लागतो. हे संयुग यकृताला रक्तप्रवाहातून हानिकारक विषाक्त घटक काढून टाकणारे एंझाइम तयार करण्यास मदत करते. जेव्हा रक्त स्वच्छ असते तेव्हा त्याचा चांगला परिणाम थेट पायांच्या स्नायूंवर होतो. स्वच्छ, ऑक्सिजनयुक्त रक्त स्नायूंना बळकटी देते. वृद्धांमध्ये रक्ताची गुणवत्ता अनेकदा खालावते, ज्यामुळे पाय जड होणे, सूज येणे किंवा पेटके येणे, असे त्रास जाणवतात. लसणामध्ये या समस्या मुळापासून सोडवण्याची क्षमता आहे. मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार लसूण कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबदेखील नियंत्रित करतो. तो रक्तवाहिन्या लवचिक ठेवण्यासदेखील मदत करते, ज्यामुळे पायांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो. जेव्हा रक्ताभिसरण सुधारते तेव्हा स्नायूंना योग्य पोषण मिळते आणि ते हळूहळू मजबूत होऊ लागतात.

हिरव्या पालेभाज्या खा

पालक, मेथी, मोहरी, बथुआ व राजगिरा यांसारख्या हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामधील क्लोरोफिल रक्त शुद्ध करते आणि यकृतातील विषाक्त घटक काढून टाकते, ज्यामुळे यकृतावरील भार कमी होतो. आयसीएमआरच्या मते, ते फोलेट, लोह, मॅग्नेशियम व व्हिटॅमिन केचा चांगला स्रोत आहे, जे रक्तनिर्मितीस मदत करतात आणि हाडे व स्नायू मजबूत करतात. त्या पालेभाजीच्या नियमित सेवनाने वृद्धांमध्ये पायांची कमकुवतपणा आणि पेटके कमी होतात. जर तुम्ही आठवड्यातून ४-५ दिवस सूप, हिरव्या भाज्या किंवा भाज्यांच्या स्वरूपात त्यांचे सेवन केले, तर पाय आणि यकृत दोघांनाही त्याचा फायदा होईल.

अक्रोड खा

अक्रोड केवळ मेंदूसाठीच नाही, तर यकृत आणि पायांसाठीदेखील फायदेशीर आहे. त्यात असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि ग्लुटाथिओन यकृताच्या पेशींची दुरुस्ती आणि बळकटीकरण करतात. त्यामुळे प्रथिनांचा योग्य वापर होण्यास मदत होते आणि स्नायूंना ऊर्जा मिळते. तसेच पायांचा कमकुवतपणा आणि थकवा कमी होतो. हार्वर्ड हेल्थच्या मते, अक्रोड खराब कोलेस्ट्रॉल कमी करून, रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे पायांच्या स्नायूंपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते, ज्यामुळे ताकद आणि सहनशक्ती वाढते. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी यकृत चांगल्या स्थितीत आणि मजबूत पाय राखण्यासाठी दररोज दोन-तीन अक्रोड खावेत.