Loneliness Reason Impacts on Health: अलीकडील अनेक संशोधनांमधून असे समोर आले आहे की, एकटेपणा आणि सामाजिक वेगळेपण (सोशल आयसोलेशन) याचा आपल्या आरोग्यावर तितकाच वाईट किंवा कधीकधी दारू पिणे किंवा सिगारेट ओढण्यापेक्षाही जास्त वाईट परिणाम होतो. एकटेपणा ही केवळ भावनांची गोष्ट नाही, तर एक मोठा आरोग्याचा धोका बनत आहे. एकटेपणामुळे सतत तणाव (क्रॉनिक स्ट्रेस) वाढतो, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. काही अभ्यास असेही सांगतात की, एकटेपणाचे दुष्परिणाम दिवसभरात १५ सिगारेट ओढण्याइतके घातक असू शकतात.
इतकंच नाही, एकटेपणाचा थेट संबंध डिप्रेशन, चिंता आणि मेंदूच्या कार्यक्षमता कमी होण्याशी जोडला गेला आहे. वृद्ध लोकांमध्ये यामुळे डिमेन्शियाचा धोकादेखील वाढू शकतो. जे लोक एकटेपणात जगतात, त्यांना अनेकदा झोप येण्यास अडचण होते किंवा त्यांची झोप चांगली होत नाही, यामुळे त्यांच्या एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याशिवाय, एकटे असलेले लोक अनेक वेळा चुकीच्या सवयी लावून घेतात, जसे की कमी व्यायाम करणे, चुकीचे खाणे आणि कधी कधी दारू किंवा ड्रग्सचा वापर करणे, ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणखी खराब होते.
उद्दिष्टपूर्ण जीवन जगण्यातच समाधानी आयुष्याचे रहस्य…
१०२ वर्षांचे अमेरिकन डॉ. हॉवर्ड टकर यांनी जगातील सर्वात वयोवृद्ध कार्यरत डॉक्टर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. त्यांना वाटते की दारू आणि सिगारेटपेक्षा अधिक धोकादायक सवय म्हणजे “एकटेपणा.” त्यांचे म्हणणे आहे की एकटेपणामुळे हृदयविकार, डिप्रेशन आणि इतर आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. ते म्हणतात की, जर तुमच्या जीवनात कोणतेही उद्दिष्ट नसेल तर कोणतीही चमत्कारी डाएट किंवा सप्लिमेंट तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकत नाही. एका मुलाखतीत डॉ. टकर म्हणाले की, निवृत्ती दीर्घायुष्याचा शत्रू आहे. त्यांच्या मते, दीर्घकाळ टिकणारे आणि समाधानी जीवन हे गोळ्यांमध्ये नसते, तर उद्दिष्टपूर्णजीवन जगण्यात असते.
सतत सक्रिय राहणे आणि शिकणे
डॉ. टकर म्हणतात की, आयुष्यात व्यस्तपणापासून दूर न जाता मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्रिय राहिले पाहिजे. ते सांगतात की छंद, स्वयंसेवा (वॉलंटियर वर्क) किंवा हलक्या जबाबदाऱ्या (लाइट रिस्पॉन्सिबिलिटीज) सुद्धा मेंदूला सक्रिय ठेवू शकतात. त्यांच्यानुसार, सतत शिकणे आणि कुतूहल हे मेंदूसाठी आवश्यक व्यायाम आहेत, जे मेंदूची स्पष्टता टिकवून ठेवण्यास मदत करतात. डॉ. टकर यांनी १०० वर्षांपर्यंत डॉक्टर म्हणून काम केले आणि ते फक्त तेव्हाच थांबले, जेव्हा २०२२ मध्ये ते ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते ते बंद झाले.
नाती आणि वैयक्तिक आवड (पॅशन)
प्रोफेशनल कामांव्यतिरिक्त, डॉ. टकर नात्यांमधून आणि त्यांच्या वैयक्तिक आवडींमधून एनर्जी मिळवतात. त्यांच्या लग्नाला ७० वर्षांहून अधिक काळ झाला आहे आणि ते चार मुलं आणि दहा नातवंडांच्या मोठ्या कुटुंबाचे अभिमानी प्रमुख आहेत. हे मजबूत कौटुंबिक नाते आणि त्यांच्या स्पोर्ट्स टीम्सबद्दलची न संपणारी निष्ठा त्यांना सतत भावनिक आधार आणि आनंद देते. संशोधनाने अनेक वेळा दाखवले आहे की, जे लोक खोल भावनिक अटॅचमेंट ठेवतात आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहतात, ते लोक बराच काळ आणि निरोगी आयुष्य जगतात.
शिकणे आणि शारीरिक हालचालीचे (फिजिकल अॅक्टिविटीचे) महत्त्व
डॉ. टकर फक्त डॉक्टरच नाहीत, तर ते कायद्याचे अभ्यासक (लीगल स्कॉलर) देखील आहेत. त्यांनी ६७ वर्षांच्या वयात कायद्याची पदवी घेतली. हे सिद्ध करतं की वय कधीच शिक्षण किंवा वैयक्तिक प्रगतीत अडथळा ठरत नाही. मृत्यूबद्दल विचारले असता, त्यांनी वास्तववादी (रिअलिस्टिक) दृष्टिकोन ठेवला आणि सांगितले की, मृत्यूची अटळता (इनविटेबिलिटी) जीवनाची किंमत (लाइफ व्हॅल्यू) अधिक वाढवते. त्यांच्या मते, शेवट स्वीकारणे माणसाला वर्तमानात उत्साहाने जगण्याची प्रेरणा देते. शारीरिक हालचाल ही देखील टकर यांच्या तत्त्वज्ञानाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. ते रोजच्या हालचालींच्या महत्त्वावर भर देतात आणि सांगतात की फक्त १५ मिनिटांचा साधा वॉकदेखील अकाली मृत्यूची शक्यता खूप कमी करू शकते.
संतुलित आहार (बॅलेन्स्ड डाएट) महत्त्वाचा
त्यांचा आहार संतुलन आणि मोजमाप यावर आधारित आहे. ते सकाळची सुरुवात हंगामी फळे किंवा सिरीअल्ससोबत लो-फॅट दूध घेत करून करतात आणि कॉफीऐवजी चहा पसंत करतात. मेंदूची स्पष्टता टिकवण्यासाठी ते अनेक वेळा दुपारचे जेवण चुकवतात. रात्रीच्या जेवणात सहसा मासे किंवा वेगवेगळ्या भाज्या, विशेषतः ब्रोकली आणि कधी कधी मांस असते.