अनेक लोकांना वजन कमी करावेसे वाटते पण ते तसे करू शकत नाहीत. तसेच काही लोक असे आहेत जे साखर, मिठाई इत्यादी गोड पदार्थांचे सेवन करतात. ते गोड खाण्याच्या लालसेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना वजन कमी करणे शक्य होत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की जर साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते, ज्याचा तुमच्या आरोग्यावर खूप हानिकारक परिणाम होतो. मात्र, साखर न सोडता तुम्ही वजन कसे कमी करू शकता, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • आहारात फायबरचा समावेश करा

फायबर असलेले अन्न खूप पौष्टिक असते, त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो, त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तसेच, वजन कमी करणे सोपे आहे. जर तुम्ही डायटिंग करतानाही साखरेचे सेवन करत असाल तर त्या काळात तुम्ही फायबर असलेली फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून आरोग्याला फारशी हानी होणार नाही.

फ्लश करताना टॉयलेट सीटचे झाकण बंद ठेवावे की उघडे? संशोधनातून समोर आली माहिती

  • फास्ट फूडचे सेवन टाळा

डाएटिंगमध्ये फास्ट फूड टाळणे आवश्यक आहे. जर तुम्ही सतत व्यायाम करूनही फास्ट फूडचे सेवन करत असाल तर अशा परिस्थितीत तुमचे वजन कमी होऊ शकत नाही. कारण फास्ट फूडमध्ये साखर देखील आढळते, जी तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात योग्य ठरणार नाही.

  • चालणे

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चालणे, यामुळे तुमची चरबी बर्न होते तसेच वजन कमी होते. चालण्याने अनेक आजारांचा धोका टळतो. उलट ते शरीर मजबूत आणि तंदुरुस्त बनवते, ज्यामुळे वजन सहज कमी होऊ शकते. त्याचवेळी, दररोज चालण्याने तुम्हाला बॉडी शुगर डिटॉक्स करण्याची गरज नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांशी संपर्क साधा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lose weight without leaving sweets follow these simple tips pvp
First published on: 09-06-2022 at 14:09 IST