रिलेशनशिपमध्ये असताना वारंवार वाद होत असतील तर ब्रेकअप करण्याचा पर्याय जास्त योग्य वाटतो. ब्रेकअपनंतर प्रियकर आणि प्रेयसी दोघांच्या मनात परस्परांबद्दल अढी निर्माण होते. ब्रेकअपनंतरही प्रेयसीच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर कायम टिकून राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टींची काळजी घ्या.

मैत्रीची भावना संपवू नका
ब्रेकअपनंतर शक्य असेल तितके माजी प्रेयसीबरोबर विनम्रतेने वागा. प्रेम तुटले तरी आजही चांगले मित्र म्हणून तिच्यासोबत आहात हा विश्वास तिच्या मनात निर्माण करा. मागच्या जुन्या गोष्टी विसरुन नवीन सुरुवात करायची आहे हे पटवून द्या.

दृष्टीकोन बदला
अनेकदा जुन्या चुकांमुळे ब्रेकअप होतो. त्यामुळे एक्स गर्लफ्रेंडकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायलाच हवा पण त्यांच्याबरोबरच्या वागण्यातही सुधारणा करा.

उपकारांची जाणीव करुन देऊ नका
ब्रेकअपनंतरही माजी प्रेयसीच्या टच मध्ये असताना काही जण आपण रिलेशनशिपमध्ये असताना किती त्याग करायचो याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न करतात. सहाजिकच त्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल चीड निर्माण होते. त्यातून ती व्यक्ती पुन्हा तुमचा सन्मान करत नाही. त्यापेक्षा तुम्ही रिलेशनशिपमधल्या चांगल्या दिवसांची आठवण करुन द्या. त्यामुळे तुमच्याबद्दल आदर टिकून राहिल.

शब्दांवर नियंत्रण ठेवा
अनेकदा ब्रेकअपनंतर काही जणांना स्वत:वर कंट्रोल ठेवता येत नाही. ती भेटल्यानंतरही जुन्या रागामुळे अनेकदा तोंडातून अपशब्द निघतात किंवा भावना दुखावणाऱ्या गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे आता मैत्री सुद्धा नको अशी भावना निर्माण होते. त्यामुळे शब्दांवर कंट्रोल ठेवा.