सौर मंडळातील सूर्याच्या गतीत बदल झाल्याने यंदा संक्रात १५ जोनवारीस येत आहे. वर्षभरातील माल मापनासाठी कर्कसंक्रात आणि मकरसंक्रात उपयोगात आणल्या जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करून उत्तरायण सुरू होते. या सणाच्या दिवशी दानधर्म केल्यास पुण्य लागते असेही म्हटले जाते.

काय आहे मुहूर्त ?
यंदाचा संक्रांतीचा शुभ मुहूर्त हा बुधवार १५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार असून सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार असून सकाळी ९ वाजेपर्यंत आहे.

25th April Panchang Marathi Rashi Bhavishya Thursday 48 Minutes Abhijaat Muhurta
२५ एप्रिल पंचांग: गुरुवारी ‘ही’ ४८ मिनिटे आहे अभिजात मुहूर्त; मेष ते मीन राशीला लक्ष्मी नारायण कसे देतील आशीर्वाद?
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा

पूजेचा विधी
मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांमध्ये धन-धान्य टाकले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते यानंतर गृहिणी एकमेकांनी वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात. पुजेसाठी छोटे मडके किंवा सुगडे आणले जातात. या सुगड्यांना दोऱ्याने बांधतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते.

मकरसक्रांतीचे पौराणिक महत्त्व
मकरसंक्रांतीच्याच दिवशी गंगा नदीचे आगमन पृथ्वीवर झाले होते अशी आख्यायिका आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहाचा स्वेच्छाने त्याग केला होता. दक्षिणायनमध्ये जर आपल्या देहाचा आपण त्याग केला तर आपल्याला गती मिळणार नाही अशी भीष्मांची आस्था होती. त्यामुळेच त्यांनी उत्तरायण हा काळ निवडला होता. उत्तरायणाचे सहा महिने हे शुभ असतात असे भगवद्-गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटले आहे.

मकर संक्रातीची तारिख बदलत राहणार?
पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार ही तारिख पुढे सरकत जाणार आहे. याचे कारणही त्यांनी सांगितले. आर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते, तेथे सहा महिन्यांचा दिवस व सहा महिन्यांची रात्र असते. सूर्य २१ डिसेंबर रोजी सायन मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिनमान वाढत जाते . परंतु आपली पंचांगे ही निरयन असल्यामुळे सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत असते. मकर संक्रांत नेहमी १४ जानेवारीला येते असे नाही. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबर रोजी आली होती. सन १८९९ पर्यंत मकर संक्रांती १३ जानेवारीला येत होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांती १४ जानेवारीला येत होती. १९७२ पासून सन २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल असेही पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.