Arranged Marriage : लग्न हे आयुष्यातील असं बंधन आहे की, या बंधनात अडकल्यावर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात. लग्नाचे दोन प्रकार मानले जातात. कुटुंबाच्या सहमतीने केलेले लग्न म्हणजे अरेंज मॅरेज आणि एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर लग्न करणे म्हणजे प्रेमविवाह, यालाच आपण लव्ह मॅरेज म्हणतो.

लव्ह मॅरेजमध्ये लग्नाच्या आधीच मुलगा मुलगी एकमेकांना चांगल्याने ओळखतात. त्यांच्या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, विश्वास हा लग्नाच्या आधीपासूनच असतो; त्यामुळे लग्नानंतर नातं फुलवायला त्यांना फार वेळ लागत नाही, पण अरेंज मॅरेजमध्ये तसं नसतं. अरेंज मॅरेजमध्ये दोन अनोळखी व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात. या नात्यात हळूवारपणे मैत्री, प्रेम, काळजी, जिव्हाळा, विश्वास आणि समजूतदारपणा दिसून येतो.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
how to find out job as a fresher
Job For Fresher : फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स

हेही वाचा : पक्ष्यांनाही कळतं कचरा कुठे टाकावा; माणसांना कधी कळणार? व्हिडीओ एकदा पाहाच …

खरं तर अरेंज मॅरेजमध्ये नातं फुलवायला आणि नात्यात प्रेमाचा रंग भरायला वेळ लागतो, पण काही खास टिप्स वापरून तुम्ही अरेंज मॅरेज यशस्वी बनवू शकता. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

जर तुमचे अरेंज मॅरेज होत असेल तर लग्नापूर्वीच तुम्ही जोडीदाराबरोबर मैत्री करा. यामुळे तुम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. जोडीदाराच्या आवडी निवडी लग्नापूर्वीच समजून घेतल्या तर वैवाहिक आयुष्यात अडचणी येणार नाही.

अरेंज मॅरेजमध्ये जोडीदार तुमच्यासाठी अनोळखी असतो, त्यामुळे त्याला समजून घ्या. भूतकाळातील गोष्टींवरून गैरसमज निर्माण करू नका. त्यांना नवीन गोष्टी स्वीकारायला वेळ द्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

हेही वाचा : पोळीला इंग्रजीत काय म्हणतात? जाणून घ्या एका क्लिकवर

अरेंज मॅरेजमध्ये मैत्री ही खूप महत्त्वाची असते. जेव्हा तुमचा जोडीदार तुमचा खूप चांगला मित्र किंवा मैत्रीण असेल, तर तुम्ही आणखी मनमोकळेपणाने त्यांच्याबरोबर बोलू शकता. मनातील गोष्टी त्यांना सांगू शकता, पण तुमच्या बोलण्यात प्रामाणिकपणा असणे खूप जास्त गरजेचे आहे.

अरेंज मॅरेजमध्ये एकमेकांचा आदर करणे अत्यंत गरजेचे आहे. एकमेकांच्या विचारांना महत्त्व द्या. एकमेकांच्या कुटुंबाबरोबर सन्मानाने वागा. कोणताही निर्णय एकमेकांच्या सहमतीने घ्या, ज्यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट होईल.

प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी लहान मोठ्या समस्या येतात. या समस्यांचा सामना करताना एकमेकांबरोबर ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. संकटाच्या वेळी जोडीदाराला साथ द्या आणि तुम्ही त्यांच्याबरोबर कायम आहात, असा त्यांना विश्वास दाखवा. यामुळे कितीही अडचणी आल्या तरी तुमचे नाते कधीही तुटणार नाही.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)