तुम्हाला परदेशात फिरण्याची आवड आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कदाचित तुम्हाला हे माहित असेल की, अधिकृत भारतीय पासपोर्टसह तुम्हाला २४ देशांमध्ये व्हिसा-फ्रि फिरता येते. पण आता तुम्ही तुमच्या भारतीय पासपोर्टवर ४८ देशांमध्ये भ्रमंती करु शकता. पण कसे? चला तर मग जाणून घेऊ या.

तुम्हाला फक्त एक साधा हॅक वापरुन तुमचा भारतीय पासपोर्ट अपडेट करायचा आहे. तुम्हाला तुमच्या पासपोर्टमध्ये यूएस टूरिस्ट किंवा वर्क व्हिसा हे जोडायचे आहे. याला “व्हिसा-फ्रि ट्रान्झिट” किंवा “ट्रान्झिट व्हिसा” असे म्हणतात.

भारतीय पासपोर्टवर ४८ देशांमध्ये करु शकता व्हिसा शिवाय प्रवास

ट्रॅव्हल कोच आकांक्षा मोंगा यांच्या म्हणण्यानुसार, या पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमचा भारतीय पासपोर्टवर ४८ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरु शकता. यात सहज भेट देता येणाऱ्या काही देशांमध्ये मलेशिया, अर्जेंटिना, पेरू, सिंगापूर, अल्बेनिया, क्युबा, बहामास आणि इजिप्त यांचा समावेश आहे. आणि तुमच्याकडे यूएस व्हिसा नसल्यास, या या ठिकांनी प्रवास करण्यासाठी तुम्ही फक्त ई-व्हिसासाठी अर्ज करा.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, व्हिसाचे नियम बदलू शकतात, त्यामुळे प्रवासाचा कोणतीही प्लॅन करण्यापूर्वी तुम्ही ज्या देशाला भेट देण्याची योजना करत आहात त्या देशाच्या दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधणे उत्तम आहे. याव्यतिरिक्त, व्हिसा आवश्यक नसला तरीही, प्रवाश्यांनी अद्याप देशाच्या प्रवेशासाठी आवश्यक नियमांचे पालन केले पाहिजे, जसे की, वैध पासपोर्ट, पुढील प्रवासाचा पुरावा आणि त्यांच्या मुक्कामाच्या कालावधीसाठी पुरेसा बँक बॅलन्स.

Video : मुंबई लोकलमध्ये फॅशनचा जलवा! तरुण थेट स्कर्ट घालून ट्रेनमध्ये चढला अन्…

भारतीय पासपोर्ट किती शक्तिशाली आहे?

भारतीय पासपोर्ट धारक केवळ २४ देशांमध्ये व्हिसा-फ्रि प्रवेशासह ६९ व्या क्रमांकावर आहेत. पासपोर्ट इंडेक्स २०२२ नुसार, त्यांना ४८ देशांसाठी व्हिसा ऑन अरव्हाइल आणि १२६ इतर देशांसाठी व्हिसा आवश्यक आहे.

सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे युएईचा

संयुक्त अरब अमिराती (UAE) कडे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे, ज्यामुळे प्रवाशांना व्हिसाशिवाय १८० देशांमध्ये प्रवेश करता येते. १२१ देश व्हिसा-फ्रि प्रवेश देतात आणि ५९ देशांमध्ये व्हिसा ऑन अरव्हाइल आवश्यक आहे. UAE पासपोर्टसाठी फक्त ८९देशांसाठी व्हिसा आवश्यक आहे.

जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन, लक्झेंबर्ग आणि दक्षिण कोरिया दुसऱ्या स्थानावर आहेत, ज्यांच्याकडे १२६ देशामध्ये व्हिसा- फ्रि प्रवास करण्याची क्षमता आहे आणि ४७ देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल आवश्यक आहे. युनायटेड स्टेट्स पासपोर्ट ११६ देशांमध्ये व्हिसा-फ्रि प्रवेशासह तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर युनायटेड किंगडम चौथ्या स्थानावर आहे.

५२८ किमी सलग धावणारी एकमेव भारतीय ट्रेन कोणती? महाराष्ट्रात ‘या’ स्थानकातुन जर ट्रेन चुकली तर थेट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे अफगाणिस्तानचा

रँकिंगमध्ये असेही दिसून आले आहे की, अफगाणिस्तानकडे सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे, फक्त ३८ देशांना व्हिसा-फ्रि प्रवेशाची परवानगी आहे. पाकिस्तानी पासपोर्ट धारक केवळ १० देशांमध्ये व्हिसा-फ्रि प्रवास करू शकतात, तर सीरियन आणि इराकी पासपोर्टधारक केवळ ८ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात