करोनाने आपल्या रोजच्या आयुष्यात जे काही खूप मोठे बदल केलेत त्यातलाच एक म्हणजे बदलेली कामाची पद्धत अर्थात Work From Home सारखा पर्याय. तुम्हाला आठवत असेल तर अगदी सुरुवातीच्या लॉकडाउनच्या काळात Work From Home हा ऑप्शन सर्वांनाच उत्तम वाटला. लाखो लोकांनी त्याचं स्वागत केलं आणि घरातून जोमाने काम करायला सुरुवात केली. पण हळूहळू त्यातल्या अडचणी समोर आल्या आणि आता जवळपास वर्षभरातच ह्याच्या फायद्या-तोट्यांवर, चांगल्या वाईट परिणामांवर विविध अनुषंगाने चर्चा होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे आता जगभरातील बहुतांश कंपन्यांनी यापुढेही कायमच ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे एक नवी कामाची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर जगभरात रुजतेय. अशावेळी काळासोबत आपणही चालत बदल स्वीकारायलाच हवेत. पण ‘वर्क फ्रॉम होम’मुळे येणाऱ्या ताणाचे काय? शारीरिक मानसिक समस्यांचे काय? हे प्रश्न कायम आहेत. तुम्हालाही ‘वर्क फ्रॉम होम’चा ताण येतोय का? तर मग पाहूया काही हलक्या-फुलक्या टिप्स, ज्यामुळे तुमचं वर्क फ्रॉम होम हॅपनिंग होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make your work from home more interesting decorate your home office like this gst
First published on: 18-07-2021 at 18:00 IST