How to Remove Hair from Your Upper Lip : ओठांवरील मिशी पुरुषांची शान असते. तर महिलांसाठी ओठांवरील केस श्राप असतो. अशा फार कमी महिला असतील ज्यांना ओठांवर केस नसतील पण ज्यांना ओठांवर दाट लव असते त्यांना ती नकोशी होते. मग काय दर १५ दिवसांनी महिला पार्लरकडे धाव घेतात आणि ओठांवरील लव काढून घेतात. नको असलेले केस काढण्यासाठी थ्रेडिंग सगळ्यांनाच आवडत नाही, कारण त्याचा खूप त्रास होतो. काही दिवस तुमचा चेहरा चांगला दिसावा म्हणून कोणत्या पद्धतीने केस काढता? त्या पद्धतीचा तुमच्या त्वचेवर काही परिणाम होऊ शकतो का? याचा विचार केलाय का ? काळजी करु नका, आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ही समस्या एका झटक्यात दूर होईल. तुम्हाला त्रासही होणार नाही आणि पार्लरमध्येही जावे लागणार नाही. काही आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवेल.

घरगुती उपाय

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

१. मध, साखर आणि लिंबाचा रस हे सगळे १ चमचा घ्या. चमच्याने हलवून हे मिश्रण एकजीव करा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर ज्याठिकाणी केस आहेत तिथे लावा. १५ ते २० मिनीटांनंतर हलक्या हाताने मसाज करुन हा पॅक काढा. मध चिकट असल्याने या पॅकसोबत केस निघून येण्यास मदत होईल. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग नक्की करु शकता.
अपर लिप्स

२. चमचाभर मेथीच्या दाणे पाण्यात भिजत घाला. त्यानंतर त्याची मिक्सरवर पेस्ट तयार करुन ही पेस्ट चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहऱा स्वच्छ धुवून टाका. त्यामुळे केस निघून जाण्यास मदत होऊ शकते. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय तुम्ही केल्यास चेहऱ्यावरचे केस निघून जाण्यास मदत होईल.

हेही वाचा >> Kitchen Jugaad: चालू गॅसवर एकदा तांदूळ नक्की टाका; टळेल मोठा धोका, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

३. मक्याच्या पीठात साखर आणि अंडे एकत्र करा. त्याची पेस्ट चेहरा आणि हातांवर लावा. थोडा वेळ ठेऊन ही पेस्ट धुवून टाका. त्यामुळे चेहरा आणि हातावरचेही केस निघून जाण्यास मदत होईल.