२७ फेब्रवारी हा दिवस जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीतील थोर लेखक-कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो. महाराष्ट्रातील जनतेच्या अभिमानाचा, आत्मियतेचा, मराठमोळ्या संस्कृतीचा आणि साहित्याच्या गुणगौरवाचा हा दिवस. या दिवसी राज्य सरकार, विविध संस्था, राजकीय पक्षांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं. या दिनाचे औचित्य साधत शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवण्याचा हा दिवस. सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्रॅम या माध्यमातून हे शुभेच्छा संदेश शेअर करुन तुम्ही मातृभाषेचा अभिमान जागवू शकता.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

supriya sule ajit pawar baramati latest news
“…तर अजित पवार मलाच मतदान करतील”, सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या, “माझा मराठीतला कार्यअहवाल…!”
hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
Aditya Thackeray
‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय

जगण्यासाठी जिंकण्यासाठी
इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई गं’
म्हणतो तीच असते आपली भाषा खरी
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

भाषेचा गोडवा साखरेहूनी फार,
मऊ मखमली असली तरी
शब्दांना तिच्या धार,
वळवावी तशी वळते
सहज सगळ्यांना कळते.
भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्र्यात आहे, भविष्याचे वरदान
महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय

रुजवू मराठी फुलवू मराठी
चला बोलू फक्त मराठी
मराठी दिनाच्या शुभेच्छा

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी माझी जात!
मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती!
मराठी माझं रक्त!
मराठी माझी शान!
मराठी माझा मान!
मराठी माझा राजा!
जय शिवराय

माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

मराठी ही आपली मातृभाषा आहे, हीचा सन्मान व संवर्धनासाठी प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. मराठी भाषेचा अभिमान आपल्याला कायम असला पाहीजे. जिथे शक्य होईल तिथे मराठी भाषेचा वापर केला पाहीजे. त्यामुळे मराठी भाषेचा जागर होत राहील. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा