How To Keep Sprouts Fresh: वजन कमी करण्याचा प्लॅन असो किंवा मधुमेह, हृदय, कोलेस्ट्रॉल यामुळे होणाऱ्या त्रासांवर उपाय करायचा असो आहारावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. बहुतांश डाएट प्लॅनमध्ये डॉक्टर मंडळी सकाळचा नाष्टा किंवा रात्रीचे जेवण यासाठी स्प्राऊट्स खाण्याचा सल्ला देतात. मोड आलेले कडधान्य ज्यात मूग, मटकी, चवळी, चणे असे विविध प्रकार समाविष्ट असतात. हे जीवनसत्व, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांचा समृद्ध साठा मानले जाते. नेहमीच्या भाजीहून वेगळ्या अशा रेसिपी सध्या सहज करता येतात. उन्हाळ्याच्या दिवसात कडधान्यांना पटकन मोड येत असल्याने वेळ व मेहनतीची खूप बचत होते पण अनेकदा मोड आलेल्या कडधान्यांचा आंबट कुबट वास घालवण्यासाठी करावी लागते. आज आपण यावरच काही सोपे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमचे स्प्राऊट्स व किचनही फ्रेश राहू शकेल.
कडधान्य व किचन फ्रेश ठेवण्यासाठी खास टिप्स (How To Keep Sprouts Fresh)
१. कडधान्य नीट निवडून घ्या, अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजल्यावर अधिक कुजण्याचा धोका असतो. यामुळे कडधान्यात सुद्धा चिकटपणा आणि वास येऊ शकतो
२. कडधान्ये सुरुवातीला कडक तापलेल्या पाण्यात भिजवा जेणेकरून त्यांची सालं निघून जातात मग वाटल्यास कडधान्ये थंड किंवा साध्या पाण्यात भिजवावेत सालं असलेल्या कडधान्यांना कुबट वास येण्याचे प्रमाण जास्त असते.
३. शक्य असल्यास जेव्हा तुम्ही कडधान्य भिजल्यावर उपसून ठेवता तेव्हा शक्यतो बांधून ठेवा जेणेकरून वास घरभर पसरणार नाही.
४. तुम्ही कडधान्य चाळणीत किंवा भांड्यात ठेवत असाल तर त्याखाली टिश्यू पेपर ठेवा ज्यामुळे चिकटपणा शोषून घेतला जाईल. ज्यामुळे वास येण्याचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकते.
५. फ्रीजमध्ये मागच्या बाजूला स्प्राऊट कंटेनर किंवा झिप-लॉक बॅग ठेवणे टाळा. फ्रिजचे तापमान काही वेळा मागच्या बाजूला थंड असते, ज्यामुळे अंकुर गोठू शकतात. एकदा स्प्राउट्स गोठल्यानंतर, त्यांचा पोत आणि चव खराब होईल, म्हणून त्यांना फ्रिजच्या पुढील बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
हे ही वाचा<< अक्रोड वापरून वजन झपाट्याने कमी करू शकता? परफेक्ट बॉडीसाठी ‘या’ ५ पद्धती ठरू शकतात बेस्ट
वरील टिप्स वापरून तुम्हाला कसा रिझल्ट मिळतो हे कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स साठी लोकसत्ताचे लाइफस्टाइल सेक्शन नक्की पाहा.