How To Apply Masoor Dal Facepack : चेहरा चमकदार दिसण्यासाठी आपण नेहमी वेगवेगळ्या वस्तू चेहऱ्यासाठी वापरतो. चेहरा उजळवण्यासाठी विविध उत्पादने बाजारात उपलब्ध असतात. काही जण ही महागडी उत्पादने खरेदी सुद्धा करतात आणि चेहऱ्यावर लावतात. पण, या उत्पादनांमध्ये अशी रसायने असतात जी कधीकधी त्वचेला हानी पोहोचवू शकतात. जर तुम्हालाही तुमचा चेहरा मऊ आणि चमकदार दिसावा असा वाटत असेल तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा.

तुमच्यासाठी मसूरपासून बनवलेला फेस पॅक हा एक चांगला पर्याय असू शकतो.

मसूर पॅक त्वचेला देतो पोषण

मसूरचे आहारात सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते असले तरीही त्वचेच्या काळजीसाठी देखील खूप फायदा होतो. मसूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात जे त्वचेला आतून पोषण देतात आणि नैसर्गिकरित्या चमक देतात. टॅनिंग, काळे डाग आणि सुरकुत्या असलेल्यांसाठी मसूर डाळीचा पॅक फायदेशीर ठरू शकतो.

मसूरचा फेसपॅक कसा बनवायचा?

मसूरचा फेसपॅक बनवण्यासाठी, प्रथम मसूर रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी पाण्यातून डाळ काढा काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात एक चमचा गुलाब पाणी, अर्धा चमचा मध आणि थोडे दही घाला. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता. व्यवस्थित मिक्स करा.

चेहऱ्यावर मसूरचा फेसपॅक कसा लावायचा?

चेहऱ्यावर मसूरचा फेसपॅक लावण्यासाठी, प्रथम तुमची त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावून घ्या. सुमारे २० मिनिटे तसेच राहू द्या. पॅक सुकल्यावर, गोलाकार हलक्या हाताने मालिश करा आणि पाण्याने धुवा. यामुळे घाण सहज निघून जाईल. तुम्ही हा पॅक आठवड्यातून दोनदा तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता.

मसूर डाळीचा फेसपॅक लावण्याचे फायदे

मसूर डाळीचा फेसपॅकमध्ये नैसर्गिक क्लिंजिंग गुणधर्म असतात; जे त्वचेला खोलवर स्वच्छ करतात. हा फेसपॅक त्वचेतील अतिरिक्त तेल सहजपणे काढून टाकतो आणि छिद्रांना घट्ट करतो.