Online Matrimonial Frauds : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो, त्यामुळे ते योग्य व्यक्तीबरोबर होणं फार गरजेचे असते. पूर्वी घरातील मंडळी मुला- मुलींसाठी योग्य जीवनसाथीची निवड करत होते, पण आता काळ बदलला. हल्लीची तरुणाई स्वत:चं मॅट्रिमोनिअल साइट्सवर ऑनलाइन जीवनसाथी शोधताना दिसतात. स्वत:ची आवड, सवयी, छंद अशा अनेक गोष्टींना मॅच करेल असा जीवनसाथी ते या साईट्सवर शोधत असतात.

जर तुम्हीही मॅट्रिमोनिअल साइट्सवर स्वतःसाठी जीवनसाथी शोधत असाल, तर खालील काही टिप्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण हल्ली अशा ऑनलाइन मॅट्रिमोनिअल साइट्सवर जीवनसाथी शोधताना खूप फसवणूक होते. या साईट्सवर प्रेमाच्या जाळ्यात ओढत कधी आर्थिक फसवणूक केली जाते, तर अनेकदा बॅकमेलिंगचे प्रकारही समोर येतात, त्यामुळे खालील टिप्स फॉलो करत तुम्ही फसवणूक टाळू शकता.

१) व्हेरिफाइड प्रोफाइल

मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर जोडीदार शोधताना नेहमी व्हेरिफाइड प्रोफाइलला प्राधान्य द्या. व्हेरिफाइड प्रोफाइल विश्वसनीय असतात, कारण त्यातील व्यक्तीची ओळख आणि माहिती पूर्णपणे तपासली गेलेली असते.

२) वैयक्तिक माहिती शेअर करू नका

कोणत्याही मॅट्रिमोनिअल साईटचा वापर करताना, सुरुवातीला कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका. तुमचा पत्ता, बँक डिटेल्स, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कोणालाही शेअर करू नका.

३) अशा लोकांपासून सावध राहा

जर कोणी तुम्हाला मॅट्रिमोनिअल साईटवर पैसे मागत असेल तर अशा लोकांपासून सावध राहा. कोणावरही विश्वास ठेवून पैशांचे व्यवहार करू नका. जर तुम्ही कोणाशी बोलू लागलात तर तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना त्याच्याबद्दल नक्की माहिती द्या.

४) पर्सनल फोटो, व्हिडीओ पाठवू नका

मॅट्रिमोनिअल साईटवर अनेकदा मुलींकडून पर्सनल फोटो, व्हिडीओ मागितले जातात. पण कोणीही तुमच्याकडे फोटोज, व्हिडीओ किंवा कोणत्याही वैयक्तिक बाबींविषयी माहिती विचारल्यास ती देऊ नका, यावरून तुम्हाला बॅकमेल केले जाऊ शकते.