Sperm Count: पुरुषांमधील शुक्राणूंची सतत घटणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे. शुक्राणूंची संख्या कमी असल्याने वंध्यत्वाची समस्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा स्पर्म काउंट वाढवायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला स्पर्म काउंट कसे वाढवायचे ते सांगणार आहोत…

शुक्राणूंची संख्या अशा पद्धतीने वाढवू शकतात पुरूष

पाश्चात्य आहारामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते
ज्या पुरुषांच्या आहारात पिझ्झा, फ्राईज, मिठाई, सोडा आणि रेड मीट इत्यादी पाश्चात्य पदार्थांचा समावेश असतो, अशा पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या सामान्य आहार घेणाऱ्यांपेक्षा कमी असते. दुसरीकडे जे जास्त पाश्चात्य पदार्थ खातात, त्यांच्यामध्ये प्रजननक्षमता वाढवणाऱ्या प्रजनन संप्रेरकांची कमतरता देखील असते. त्यामुळे पुरुषांनी त्यांच्या आहारातून पाश्चात्य आहार वगळला पाहिजे. याशिवाय जे पुरुष जास्त दारू आणि सिगारेटचे सेवन करतात त्यांच्या शुक्राणूंची संख्याही कमी होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

आणखी वाचा : Men Health Tips: मनुका खाल्ल्याने पुरुषांच्या ‘या’ समस्या दूर होतात, या प्रकारे सेवन करा

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी या गोष्टींचा वापर करा
जर तुम्हाला तुमच्या शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात सीफूड, पोल्ट्री, नट, संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्या यांचा समावेश करा. या सर्व गोष्टींमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने तुमच्या शुक्राणूंची संख्या वाढते.

शुक्राणूंची संख्या किती असावी?
ज्या लोकांचा आहार अधिक आरोग्यदायी आहे, जसे की ज्या पुरुषांच्या आहारात मासे, चिकन, भाज्या, फळे आणि पाणी असतं, त्यांच्या शुक्राणूंची संख्या सरासरी ४३ दशलक्ष असते. जे खूप चांगले मानले जाते. ज्या पुरुषांना वंध्यत्वाची समस्या आहे, त्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे, अशा स्थितीत, निरोगी आहार घेऊन तुम्ही ही समस्या टाळू शकता.

Story img Loader