ख्यातनाम ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी मोटर्सने (मॉरिस गॅरेज) गेल्या वर्षी  ‘हेक्टर’ ही कार लाँच केली. या कारला शानदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनी भारतात बस्तान मांडण्याच्या तयारीत आहे.  कंपनी आज भारतात आपली इलेक्ट्रीक एसयूव्ही झेडएस (MG ZS EV) लाँच करणार आहे. भारतात सध्या धावत असलेल्या विद्युत कारच्या तुलनेत एका चार्जिंगमध्ये अधिक अंतर कापणारी आणि झटपट चार्जिगची सुविधा असलेली ही कार अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल असं कंपनीने म्हटलंय. डिसेंबर महिन्यात सादर केलेल्या या कारसाठी कंपनीने प्री-बुकिंग घेणे बंद केले आहे, पण बुकिंग बंद करेपर्यंत दोन हजार 800 जणांनी बुकिंग केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. हा आकडा 2019 वर्षात भारतात विक्री झालेल्या एकूण इलेक्ट्रिक कारपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे प्री-बुकिंगच्या आकड्यांचं रुपांतर विक्रीमध्ये होतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारतीय बाजारात या एसयूव्हीची थेट स्पर्धा Hyundai Kona सोबत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पेसिफिकेशन्स काय?
i-SMART EV 2.0 technology असलेल्या या कारमध्ये इंटरनेट, आर्टिफिशियल इंटिजिजन्स , बिग डेटा, क्लाऊड कम्प्युटिंग अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला जाईल. या इलेक्ट्रीक एसयूव्हीZS मध्ये 44.5 kWh क्षमतेची बॅटरी असेल. 50 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 80 टक्के बॅटरी चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार जवळपास 340 किमीचा प्रवास ही कार करु शकेल आणि केवळ 8.5 सेकंदात ताशी 100 किमी गती प्राप्त करून शकते, असा कंपनीचा दावा आहे. यातील मोटर 353 एनएम इन्स्टंट टॉर्क आणि 143 पीएस पॉवर देते. एमजी झेडएस ईव्हीमध्ये 8.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. जी Apple carplay कारप्ले आणि Android ऑटोला सपोर्ट करते. यात फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील, युएसबी मोबाइल चार्जिंग फ्रंट अँड रियर, ब्लूटूथ आणि रीअर व्ह्यू कॅमेरा आहे.

आणखी वाचा – Tata Altroz प्रीमियम हॅचबॅक भारतात लाँच, Baleno ला मिळणार टक्कर

किंमत किती? दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, अहमदाबाद आणि हैदराबादमधून या कारची विक्री सुरू होईल. कंपनीने अद्याप या कारच्या किंमतीबाबत घोषणा केलेली नाही.  लाँचिंगवेळीच किंमतीची घोषणा केली जाईल. तरी काही रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mg motor to officially launch zs ev will clash with hyundai kona know all details sas
First published on: 23-01-2020 at 10:16 IST