जगातल्या काही जागा याची देह, याची डोळा पाहिल्याच पाहिजे, त्या बघण्याचा आनंदच काही औरच असतो. मानवाने आपली कल्पनाशक्ती वापरून काही अद्भभूत गोष्टी बनवल्या त्या नुसत्या पाहिल्या तरी आपल्याला थक्क व्हायला होत. आता याच हॉटेलचं घ्या! इतक्या सुंदरतेने हे हॉटेल बांधले आहे की मुळात हे हॉटेल आहे हेच अनेकांना ओळखता येत नसेल. निसर्गाच्या रंगात ते असे काही न्हाहून निघाले आहे की ते हॉटेल आहे असे सांगूनही कोणला विश्वास बसणार नाही.

तर या हॉटेलचे नाव आहे ‘मिररक्यूब’. हॉटेल कम ट्री हाऊस आहे. स्वीडनमध्ये हे हॉटेल आहे. विषेश म्हणेज या हॉटेलचा बाह्य भाग हा अॅल्यूमिनिअमपासून बनवला आहे. त्यामुळे या चकचकीत भागावर आजूबाजूच्या झाडांच्या प्रतिमा परावर्तित होतात. बघणा-याला जणू या काचा असल्यासारख्याच भासतात. निर्सगाच्या सानिध्यात असलेले हे हॉटेल पूर्णपणे इको हॉटेल आहे. रात्रीवेळी आकाशात दिसणा-या चांदण्या पाहायच्या किंवा पहाटे, दुपारी पक्षी निरिक्षण करण्याचा अनुभव येथे येणा-या पर्यटकांना घेता येतो. ज्यांना खरंच निसर्गाच्या सानिध्यात राहायचे आहे त्यांच्यासाठी तर ही बेस्टच जागा. पण हा यासाठी जास्त पैसे मोजण्याची तयारी करावी लागेल हे नक्की.