आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला सुंदर, चमकदार आणि मऊ त्वचा हवी असतेच. बदलत्या ऋतुप्रमाणे त्वचा कोरडी आणि फाटू लागते. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी अनेकजण सर्व प्रकारच्या महाग सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. मात्र कधीकधी ही केमिकलयुक्त प्रोडक्ट्स तुमच्या त्वचेला फायदे देण्याऐवजी हानी पोहचवत असतात. दरम्यान अशा वेळी काही टिप्स आहेत जे तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या मऊ आणि चमकदार त्वचा मिळवू शकता. अशातच काही गोष्टी अशा देखील आहेत, ज्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून आणि त्याचा वापर केल्याने तुमची त्वचा मुलायम मऊ होते.

नारळाचे तेल

शतकानुशतके भारतीय घरांमध्ये नारळाचे तेल वापर केला जात आहे. नारळाचे तेल जे अँटी-बॅक्टेरियल गुणांनी समृद्ध आहे. त्याच नारळाचे तेल हे त्वचेवरील डाग दूर करते आणि त्वचा मऊ करते. यासाठी पाण्यात थोडे खोबरेल तेल मिसळून आंघोळ करा. हा उपाय नियमितपणे केल्याने त्वचा मॉइश्चरायझ होते. यासोबतच त्वचेवर येणारे पुरळ आणि खाज इत्यादी समस्याही दूर होतात.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

ऑलिव तेल

तुमच्या आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह तेल घाला. त्यानंतर या पाण्याने शॉवर घ्या. ऑलिव्ह ऑईल नैसर्गिकरित्या त्वचा मऊ करते. आपण आपल्या शरीराला ऑलिव्ह ऑइलने मालिश करू शकता. जर तुमच्या कोपर, गुडघे आणि पायांची त्वचा कोरडी असेल तर ऑलिव्ह ऑइल वापरल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते.

ग्रीन टी

ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण त्याचबरोबर हीच ग्रीन टी तुमची त्वचा कोमल बनवण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला खोलवर मॉइश्चराइझ करतात. यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात ग्रीन टीच्या चहा-पिशव्या मिसळा. मग या पाण्याने शॉवर घ्या. हा उपाय वापरल्याने वृद्धत्व प्रक्रियाही मंदावते.

एप्सम सॉल्ट

एप्सम सॉल्ट त्वचेला डिटॉक्सिफाय करते. त्यात असलेले मॅग्नेशियम तुमची त्वचा मऊ व गुळगुळीत करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आंघोळ करताना पाण्यात एप्सम सॉल्ट देखील घालू शकता.

(टीप:- वरील टिप्स वापर करताना आपल्या फॅमिली डॉक्टरांचा व क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा.)