पावसाळा म्हंटला कि आनंदाच्या सरी बरसण्यापेक्षा अनेकदा टेन्शनच भारी पडतं. अनेक सर्वसामान्य घरात पावसासोबतच अनेक समस्या सुद्धा येत असतात. कपडे कुठे वाळत घालायचे? भिंतीला ओल धरतेय आणि अशा न संपणाऱ्या समस्यांनी आपणही वैतागले असाल तर आजचा हा लेख तुम्हाला खूप कामी येणार आहे. पावसाळ्यात एकूणच घरभर कोंदट वातावरण असल्याने अनेकदा कुबट वास येऊ लागतो. विशेषतः अंथरुणांच्या व उशी- गाद्या सुद्धा ओलसर राहतात व त्यांच्यातील कापूस भिजून दुर्गंधी येऊ लागते.

गाद्या व उशीची कव्हर्स कितीही धुतली तरी मुळात आतील कापसाला व उशीच्या कापडलाच ओलावा असल्याने हा वास काही जात नाही. अशावेळी खाली दिलेले काही घरगुती उपाय तुम्हाला वाचवू शकतात.

  • पावसाळ्यात एक दिवस आड रात्री झोपण्याच्या आधी हेअर ड्रायर उशीवर फिरवा, यातील उष्ण हवेमुळे आद्र्रता कमी होण्यास मदत होईल. आपण याऐवजी उशीवर इस्त्री सुद्धा फिरवू शकता.
  • बेकिंग सोडा हा दुर्गंधी घालवण्याचा नामी उपाय आहे. आपण उशीचे कव्हर काढून त्यावर थोडा बेकिंग सोडा पसरवून ठेवा, यामुळे पाण्याचे दव शोषून घेतले जातात. नंतर किंचित पाणी स्प्रे करून हा बेकिंग सोडा पुसून काढा.

(हे ही वाचा: Monsoon Hacks: पावसाळ्यात गांडूळ, गोम, माश्यांनी घरात घातलंय थैमान, करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय)

  • तुम्ही एका स्प्रे बॉटल मध्ये पांढरे व्हिनेगर घेऊन उशीवर स्प्रे करू शकता, यानंतर उशीला थोड्यावेळ पंख्याची हवा लागू द्या.
  • ऍक्टिव्हेटेड चारकोल हा दुर्गंधी घालवण्याचा उत्तम मार्ग आहे. मात्र हे चारकोल आपण थेट उशीवर टाकू नये, कारण त्याने डाग लागू शकतो, एखाद्या छोट्या कापडी पिशवीत टाकून आपण चारकोल कापसात ठेवू शकता.
  • अलीकडे अनेक प्रकारच्या रूम फ्रेशनर टॅबलेट सुद्धा बाजारात उपलुब्ध आहेत आपण डांबर गोळ्याप्रमाणे या टॅबलेट पिशवीत बांधून उशी मध्ये ठेवू शकता.

Home Remedies: पावसाळ्यात घराच्या भिंती ओल धरतायत? ‘या’ सवयी आजच थांबवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात फार कमी वेळा सूर्याचे दर्शन होते, मात्र शक्य होईल तेव्हा घरातील उशी व गाद्यांना ऊन दाखवा तसेच आपण अनेकदा अंथरूण पांघरूण सुद्धा बेडच्या आत किंवा कोणत्यातरी कोपऱ्यात ठेवून देतो अशाने त्यांना बिलकुल हवा लागत नाही. अगदीच पसारा वाटत असेल तर किमान झोपण्यापूर्वी काही वेळ अंथरुण बाहेर काढून ठेवा