scorecardresearch

Monsoon Health Tips : पावसाळ्यात मांसाहारापासून राहा लांब; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

पावसाळ्यात आजारांपासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्याचा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ टाळणे.

avoid nonveg food in rainy season
पावसाच्या आगमनानंतर अनेक आजारांचेही आगमन होते आणि संसर्गाचा धोका अधिक वाढतो. (Photo : Pexels)

उन्हाळ्यात कडक गर्मीमुळे हैराण झाल्यानंतर प्रत्येकजण पावसाची आतुरतेने वाट बघत असतो. अशातच पावसाच्या सरी बारसल्यावर सर्वांनाच दिलासा मिळतो. मात्र पावसाच्या आगमनानंतर अनेक आजारांचेही आगमन होते आणि संसर्गाचा धोका अधिक वाढतो. अशा परिस्थितीमध्ये या आजारांपासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्याचा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ टाळणे.

पावसाळ्यात श्रावण महिन्यात आपण पूजा आणि उपासनेच्या धार्मिक कारणांमुळे मांसाहार करणे बंद करतो. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील या काळात मांसाहारापासून अंतर राखले पाहिजे. पावसाळ्यात मांसाहार का टाळावा याची काही वैज्ञानिक करणे सांगण्यात आली आहेत, याबद्दल जाणून घेऊया.

Rainy Season Health Care Tips : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ चार गोष्टी नक्की लक्षात ठेवा

  • प्रदूषित मासे

मासे खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु पावसाळ्यात ते टाळा. खरंतर अतिवृष्टीमुळे सर्व घाण तलावात, समुद्रात वाहून जाते. ही घाण मासे खातात, त्यामुळे ते प्रदूषित होतात. जर तुम्ही हे मासे खाल्ले तर तुम्ही आजारी पडू शकता.

  • कमकुवत पचनशक्ती

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते, ज्यामुळे आपल्या पचनशक्ती कमी होते. मांसाहारी पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो. तसेच, पचनशक्ती कमकुवत असल्यास मांसाहारी अन्न आतड्यांमध्ये सडू लागते आणि या अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही असतो.

  • बुरशीचा धोका

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे हवेतील आर्द्रता वाढते, त्यानंतर बुरशीचा धोका आणि बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात थेट सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने अन्नपदार्थही अधिक वेगाने सडू लागतात.

  • आजारी जनावरे

पावसाळ्यात कीटकांची संख्या लक्षणीय वाढते आणि त्यामुळे चिकनगुनिया आणि डेंग्यूचे डास वाढू लागतात, त्यामुळे जनावरेही आजारी पडतात, त्यामुळे या प्राण्यांचे मांस खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Monsoon health tips why to stay away from nonveg in the rainy season pvp

ताज्या बातम्या