Salt in Fridge During Monsoon: पावसाळा सुरू झाला की, घरात ओलावा वाढतो आणि त्याचा सर्वांत जास्त परिणाम दिसतो आपल्या फ्रिजमध्ये. काही वेळा दार उघडताच नाकावर येते एक विचित्र दुर्गंधी, काही वेळा भाजीपाला लवकर कुजतो, तर मसाले खराब होतात. पण त्यावर एक अगदी साधं, घरगुती आणि जबरदस्त उपाय आहे. फक्त ‘मिठाने’ भरलेल्या एका वाटीची जादू! होय, तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त एक छोटीशी वाटी, त्यात भरलेलं ३-४ टेबलस्पून मीठ आणि ती फ्रिजच्या एका कोपऱ्यात ठेवा. मग पाहा काय कमाल घडते…

पावसाळ्यात तुमच्या फ्रिजमधून येणारा विचित्र वास, लवकर सडणाऱ्या भाज्या आणि वाढलेला ओलसरपणा ही तक्रार तुम्हालाही होत असेल… पण एक छोटासा उपाय या सगळ्या त्रासांना दूर करू शकतो. विशेष म्हणजे हा उपाय नक्की काय आहे, हे अनेक घरांमध्ये आजी-आईंच्या काळापासून वापरलं जातंय. तुम्हाला हे माहीत आहे का की, तुमच्या स्वयंपाकघरात असणारी एक सामान्य गोष्ट फ्रिजला वाचवू शकते. वास, ओलावा आणि जीवाणूंपासूनही? जाणून घ्या तो छोटासा उपाय, जे आजही अनेक गृहिणींचे गुप्त शस्त्र आहे.

कसे काम करते हे मीठ?

मीठ एक नैसर्गिक ह्युमिडिटी अब्सॉर्बर म्हणजेच ओलावा शोषून घेणारा घटक आहे. फ्रिजमध्ये वाढलेला ओलावा केवळ भाजीपालाच खराब करत नाही, तर बुरशी आणि जीवाणूंनाही जन्म देतो. पण, मीठ त्या ओलाव्याला शोषून घेऊन फ्रिजला कोरडं आणि स्वच्छ ठेवण्याचं काम करतं.

दुर्गंधीला बाय बाय!

फ्रिजमधील एकत्रित अन्नपदार्थांमुळे तयार होणाऱ्या दुर्गंधीवर मीठ एक नैसर्गिक डिओडोरायझरप्रमाणे काम करतं. या कटोरीत मीठ ठेवलं की, काही तासांतच वास कमी होतो आणि फ्रिजमध्ये एक आल्हाददायक वातावरण तयार होतं.

बुरशी आणि जंतूंना ‘नो एन्ट्री’

अतिरिक्त ओलाव्यामुळे ट्रे आणि फ्रिजच्या भिंतींवर बुरशी वाढते. पण, मीठ ओलावा कमी करून, जंतूंना वाढायला अडथळा निर्माण करतं.

भाजीपाला टिकतो जास्त दिवस

आर्द्रता कमी झाल्यामुळे कोथिंबीर, पालक, मिरचीसारख्या साग-भाजी अधिक दिवस ताजी राहते. या एका उपायामुळे तुमचं अन्न फुकट जाणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे लक्षात ठेवा :

  • दर ८-१० दिवसांनी मीठ बदला. कारण- ते ओलावा शोषून चिकटसर होतं.
  • मिठात बेकिंग सोडा किंवा सुकलेली लिंबाची साल घालून, त्याचा प्रभाव वाढवा.
  • वाटीखाली अॅल्युमिनियम फॉइल ठेवल्यास मीठ ओले झाल्यावर फ्रिज खराब करणार नाही. आणि साफसफाई करणे सोपे होईल.
  • अधिक प्रभावासाठी बाजूला कॉफी बीन्स किंवा सुकलेल्या टी-बॅग्सही ठेवा.

पावसात फ्रिज साफसफाईची कटकट नको असेल, तर आजच हा मिठाचा जादुई प्रयोग करून बघा. छोटा उपाय अन् मोठा फरक!