मृणाल ठाकूरचे शाहिद कपूरवरचे प्रेम आजवर लपून राहिलेले नाही. मृणाल त्याच्या अभिनयाची खूप मोठी चाहती आहे. विशेषत: ‘जब वी मेट’ चित्रपटातील त्याचा अभिनय तिला खूप भावला, यानंतर २०२२ मध्ये ‘जर्सी’ चित्रपटानिमित्ताने तिला शाहिदबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणालने शाहिदबरोबर काम करण्याच्या अनुभवाविषयी आणि वरिष्ठांबरोबर काम करताना येणाऱ्या दडपणाबाबत मोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत.

पण, मृणाल ठाकूरप्रमाणे आपल्याला अनेकदा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबर काम करताना दडपण येते, अशावेळी काय करायचे? सर्वांबरोबर चांगले विश्वासपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी आणि स्वत:चा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कसे वागले पाहिजे? याविषयी ल्यूसिड माइंड्स कोचिंगचे कार्यकारी कोच आणि संस्थापक श्रीधर लक्ष्मण यांनी इंडिनय एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

शाहिदबरोबर काम करतानाच्या अनुभवांविषयी मृणाल काय म्हणाली?

‘जर्सी’च्या चित्रीकरणादरम्यान शाहिदची एक चाहती म्हणून त्याला भेटण्यास मिळणार याचा तिला आनंद होता. पण, ज्या दिवशी तिला स्क्रिप्ट वाचनासाठी शाहिदला भेटायचे होते, तेव्हा ती पत्ता चुकली आणि पोहोचायला तिला उशीर झाला. पण जेव्हा मृणाल शाहिदला भेटली, त्यावेळी तिने त्याला स्पष्टपणे सांगण्याचे धाडस केले की, खऱ्याखुऱ्या जीवनातही तुझे हास्य अगदी पडद्यावर दिसते तसेच आहे!

मृणालवर वाक्यही न आठवण्याची स्थिती का आली?

मृणाल सांगते, ‘जर्सी’च्या शूटिंगदरम्यान सुरुवातीला काही काळ अस्वस्थ वाटायचे. शाहिद कपूरला प्रत्यक्ष सेटवर पाहून मी खूप भारावून गेले होते, ज्यामुळे अनेकदा मी माझ्या लाईन विसरून जायचे. पण, तो एक उत्तम सहकलाकार आहे. त्यामुळे ज्या लोकांचे मी पडद्यावर काम पाहिले त्यांचे कौतुक केले, त्यांच्याबरोबर काम करताना मला भीती वाटत होती.

यात नव्या भूमिकेत पाऊल ठेवताना, विशेषत: आपल्या आजूबाजूला जर फार अनुभवी सहकारी असतील तर त्यावेळी अस्वस्थ वाटू लागतो. त्यांच्याबरोबर काम करताना दडपण येते, असे मृणाल सांगते. मृणालप्रमाणे तुम्हालाही अशा परिस्थितीत काहीवेळा उत्साह आणि अस्वस्थता असे मिश्रण अनुभव येत असतील.

यावर ल्यूसिड माइंड्स कोचिंगचे कार्यकारी प्रशिक्षक आणि संस्थापक श्रीधर लक्ष्मण म्हणाले की, वरिष्ठांशी संवाद साधताना किंवा त्यांचे व्यवस्थापन करताना आत्मीयता वाटणे किंवा भारावून जाणे या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण, असे का घडते त्यामागे काही कारणं आहेत; ती म्हणजे धारणा, गृहीतके, भीती, पूर्वग्रह आणि पॉवर डायनॅमिक्स. आजूबाजूचे वातावरण आणि एखाद्या व्यक्तीला धोका म्हणून पाहण्याच्या केलेल्या चुकीच्या कल्पनेनेदेखील अनेकदा कामाच्या ठिकाणी अस्वस्थ किंवा अवघडल्यासारखे वाटते.

तुमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांचे ज्ञान आणि अनुभवांचा पुरेपूर वापर केल्यास त्याचा तुम्हाला आणि तुमच्या टीमला स्पर्धात्मकरित्या फायदा होऊ शकतो, त्यांचा व्यापक अनुभव तुमच्या टीमच्या वाढीस गती देऊ शकतो, यासह शिकण्याच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात, तसेच अंतर्दृष्टीदेखील प्रदान होऊ शकते.

वरिष्ठांबरोबर मोकळेपणाने काम करता यावे यासाठी स्वत:मध्ये काय बदल करावे?

१) स्वत:मध्ये एक आत्मप्रतिमा आणि आत्मविश्वास विकसित करा

तुम्ही काय चांगले करता, तुमच्यात कोणते चांगले गुण आहेत, तुम्ही गोष्टींमध्ये सक्षम आहात आणि तुमची प्रतिभा कशी आहे हे समजून घ्या. तुम्ही आत्मविश्वासाने विनासंकोचपणे आपले विचार, भावना आणि गरजा व्यक्त करण्याची क्षमता निर्माण करा. तुमचे आत्मचिंतन करून स्वत:मध्ये काय चांगले बदल करता येतील ते पाहा. यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने ठामपणे सांगू शकता.

२) तुमचा हेतू नेहमी स्वच्छ आणि मोकळ्या मनाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

इतरांमधील चांगल्या गोष्टी पाहण्याचा सराव करा. इतरांमधील चांगल्या सवयी ओळखून त्यांना आपले सहयोग म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा, यामुळे इतरांना तुमच्याशी संवाद साधणे आणि सहयोग करणे सोपे होईल.

३) निरोगी आणि सहयोगात्मक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा

इतरांच्या गरजा समजून घ्या आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना पाठिंबा द्या. यामुळे तुम्हालाही कधी गरज पडल्यास ते मदतीचा हात पुढे करतील.

४) न समजणाऱ्या गोष्टींविषयी वरिष्ठांशी चर्चा करा

जेव्हा एखादी गोष्टी अस्पष्ट किंवा क्लिष्ट वाटते, तेव्हा वरिष्ठांना संपर्क साधा आणि खुलेपणाने संवाद करा. वरिष्ठांना तुमचे विचार आणि भावनांची जाणीव करून द्या. यावेळी वरिष्ठांसह बोलताना तुम्हाला अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटू शकते. पण, यातून तुमच्या प्रामाणिकपणाची प्रशंसा केली जाऊ शकते, तसेच आवश्यकतेनुसार तुम्हाला पाठिंबा मिळू शकेल.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’च्या करिष्मा मेहता यांच्याशी झालेल्या संवादात मृणालने हे देखील नमूद केले आहे की, “तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेले वचन हे वचन असते. त्यामुळे तुम्हाला ते १०० टक्के पूर्ण होणार नाही असे वाटत असले तरी तुम्हाला ते करून दाखवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

यावर श्रीधर यांनी सहमती दर्शवत म्हटले की, कोणत्याही गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याआधी आणि त्याविषयी कोणाला वचन देण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. यामुळे तुम्हाला कोणत्याही कार्याचे नियोजन करण्यासाठी थोडा वेळ देता येतो. संभाव्य आक्षेप आणि अडथळे ओळखून तुम्हाला पुढील कार्यासाठी चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत होऊ शकते.

तुम्हाला व्यावसायिक आयुष्यातील यश प्राप्त करायचे असेल तर तुम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची असलेली मूल्ये आणि तत्त्वे स्पष्ट करा आणि तुम्ही दुसऱ्याला दिलेल्या वचनांचा आदर करा.

स्वत:ची काळजी घ्या, व्यायाम, विश्रांती, पोषक आहार घ्या, डोकं शांत ठेवून तुम्ही चांगले सहकारी बनवा. यासह आपल्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करा, यात तुम्ही जगाशी कसे वागता आणि संवाद साधता, या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत, असा सल्लाही श्रीधर यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृणाल ठाकूरनेही याच गोष्टींवर भर दिला. ही एकप्रकारची थेरपी आहे, जी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे. विशेषत: कलाकारांसाठी कारण ते विविध पात्र साकारत असतात, यातही प्रत्येक पात्राची भूमिका समजून त्यानुसार कलाकारांना वागायचे, जगायचे असते. अशावेळी त्या पात्रांची भूमिका संपल्यानंतर पुन्हा त्यांचे नेहमीचे रुटीन सुरु होते. पात्रे किंवा परिस्थिती किंवा वातावरण किंवा सेटअप यांच्यात गुंतून किंवा हरवून न जाता आपले नेहमीचे आयुष्य जगायचे असते. अशावेळी त्यांना वरील गोष्टी फायदेशीर ठरतात.