How to Remove Sweat Smell Naturally: उन्हाळा असो वा पावसाळा, घामाची दुर्गंधी त्रास देणारीच ठरते. बाजारातील डिओड्रंट्स, परफ्युम्सवर हजारो रुपये खर्च करूनही परिणाम काही वेळापुरतेच टिकतात. पण, घरात सहज मिळणाऱ्या एका वस्तूच्या छोट्याशा तुकड्याने दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी होऊ शकते. बाजारातील केमिकलयुक्त स्प्रे किंवा डिओड्रंट्स न वापरता, केवळ २० रुपयांत मिळणाऱ्या ‘या’ चमत्कारी वस्तूमुळे तासन्‌तास राहाल फ्रेश. ही जादुई गोष्ट नेमकी काय आहे? वाचा पुढे…

दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात घाम आणि त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी ही प्रत्येकासाठी मोठी समस्या असते. अनेक जण या वासाला झाकण्यासाठी महागडी सुगंधी द्रव्ये किंवा डिओड्रंट्स वापरतात. पण, ही रासायनिक उत्पादने केवळ तात्पुरता परिणाम करतात, शिवाय त्वचेवर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या समस्येवर कायमचा तोडगा एका साध्या आणि स्वस्त वस्तूमध्ये लपलेला आहे – फक्त २० रुपयांची तुरटी.

तुरटी काय काम करते?

तुरटीमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. हे गुण घामातून निर्माण होणाऱ्या जीवाणूंना नष्ट करतात. परिणामी, शरीरातून येणारी दुर्गंधी नाहीशी होते. त्यातील गुणधर्म त्वचेला घट्ट करतात आणि रोमछिद्र तात्पुरते आकुंचन पावतात. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या घामाचे प्रमाण कमी होते आणि शरीर दीर्घकाळ ताजेतवाने राहते.

तुरटीचा वापर कसा करावा?

अंघोळ करताना : अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा लहानसा तुकडा टाका. काही मिनिटांत तो विरघळेल आणि त्या पाण्याने अंघोळ करा, त्यामुळे संपूर्ण शरीरावरील दुर्गंधी नाहीशी होईल.

थेट वापर : तुरटीचा तुकडा पाण्यात भिजवून काखेखाली हलक्या हाताने चोळा. हे जंतुनाशक गुणधर्मांमुळे दुर्गंधी करणारे जीवाणू मारेल व त्वचेला घट्टपणा देईल. मात्र, जर खाज किंवा जळजळ जाणवली तर वापर थांबवा.

पावडर स्वरूपात : तुरटी बारीक वाटून पावडर तयार करा आणि ज्या भागांत जास्त घाम येतो तिथे लावा.

फायदे काय?

  • रासायनिक डिओड्रंट्स व सुगंधी द्रव्यांच्या दुष्परिणामांपासून बचाव.
  • अत्यंत स्वस्त व सहज उपलब्ध.
  • परिणाम दीर्घकाळ टिकणारा.
  • दुर्गंधीवर मुळातून नियंत्रण.

महागड्या परफ्यूमच्या मोहापेक्षा तुरटी हा घरगुती उपाय केवळ स्वस्तच नाही तर अत्यंत परिणामकारक आहे. किराणा दुकानात सहज मिळणाऱ्या या छोट्याशा वस्तूमुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहू शकता. पुढच्यावेळी दुर्गंधीपासून सुटका हवी असेल तर शंभर रुपयांचा डिओ न वापरता फक्त २० रुपयांची तुरटी वापरून पाहा आणि परिणाम पाहून तुम्हीही थक्क व्हाल.