Natural Skin Care Tips : अनेक तरुणी, स्त्रिया बाजारात मिळणा-या रेडीमेड साधनांचा वापर करताना दिसतात. मग त्यात फेशवॉश, क्लिंजर, टोनर, फेसपॅक यासारख्या वस्तूंचा समावेश होतो. मात्र ही प्रसाधने विकत न आणता घरच्या घरी तयार केलीत तर आर्थिक बचतीबरोबरच त्वचेला होणारी हानी टाळता येईल. अनेक स्त्रिया स्टॉबेरी, पपई यासारख्या फळांच्या माध्यमातून फेसपॅक तयार करता असतात. विशेष म्हणजे या फळांच्या व्यतिरिक्तदेखील अन्य काही फळांपासून फेसपॅक तयार करता येतो. त्यातलंच एक फळ म्हणजे आवळा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असून अॅटी-बॅक्टेरियल आणि अॅटी इन्फ्लेमेंट्री हे गुणदेखील असतात. त्यामुळे आवळ्यापासून तयार केलेला फेसपॅक किंवा फेसमास्क चेह-यासाठी कायमच उपयुक्त ठरतो. हा फेसमास्क तयार करण्याच्या काही पद्धती आहेत त्या पुढीलप्रमाणे –

१) अ‍ॅव्होकॅडो आणि आवळ्याचा फेसमास्क – त्वचेला आवश्यक असलेले पोषकद्रव्ये अ‍ॅव्होकॅडोमध्ये असतात. तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे अ‍ॅव्होकॅडो आणि आवळा यापासून तयार केलेला फेसमास्क वापरल्यास त्वचेला आवश्यक सर्व पोषकद्रव्ये पुरविली जातात. हा फेसमास्क तयार करण्यासाठी २चमचे आवळ्याचा रस, २ चमचे अ‍ॅव्होकॅडोची पेस्ट एकत्र करुन हा लेप २० मिनीटे चेह-यावर लावावा. त्यानंतर तो वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

२) आवळा,दही आणि मधाचा फेसमास्क – आवळा,मध आणि दही यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. त्याबरोबरच चेह-यावरील पिंपल्स कमी होऊन डागदेखील नाहीसे होतात. हा फेसमास्क तयार करण्यासाठी २ चमचे आवळ्याची पावडर, १ चमचा मध, १ चमचा दही एकत्र करुन हा लेप २० मिनीटे चेह-यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

३) पपई आणि आवळ्याचा फेसमास्क – पपईच्या गरामुळे चेहरा उजळतो. तसेच चेह-यावरील मृत त्वचा निघून जाण्यासही मदत होते. यासाठी २ चमचे आवळा पावडर आणि पपईचे बारीक तुकडे एकत्र करुन हा मास्क १५ मिनीटे चेह-यावर लावा त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

४)आवळा, लिंबू आणि मध यांचा फेसमास्क – या मास्कमुळे चेह-याला थंडावा मिळतो. तसेच या लेपामुळे चेह-यावरील पुटकुळ्या कमी होतात. हा लेप तयार करण्यासाठी २ चमचे आवळ्याचा रस, १चमचा लिंबाचा रस, १ चमचा मध आणि त्यात आणखी २ चमचे आवळा पावडर एकत्र करुन हा लेप चेह-यावर लावा त्यानंतर १५ मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.