Kanya Pujan Cute & Useful Gifts : हिंदू धर्मात नवरात्रात नवरात्री आणि कन्या पूजनाचे विशेष महत्व आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसात अष्टमी आणि नवमी तिथी हे कन्या पूजनेसाठी सर्वोत्तम दिवस मानले जातात. या दिवसांमध्ये जे देवीची पूजा करतात आणि नवरात्रीच्या सर्व दिवसांमध्ये उपवास करतात. अशा महिलावर्ग विशेषतः मुलीची पूजा करतात.
२०२५ मध्ये, भारतातील बहुतेक भागांमध्ये अष्टमी (३० सप्टेंबर २०२५) रोजी तर अनेक जण नवमी (१ ऑक्टोबर २०२५) रोजी कन्या पूजा करतील. दोन्ही दिवसांना समान महत्त्व आहे. त्यामुळे कन्या पूजन करण्यासाठी तुम्ही कोणतीही तारीख निवडू शकतात.
तारीख आणि पूजेची वेळ
पंचांगानुसार, अष्टमी तिथी २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून ७ वाजता संपेल. २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुर्गा अष्टमी पूजा होईल आणि बरेच भाविक या दिवशी कन्या पूजा देखील करतात. यानंतर, नवमी तिथी ३० सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून ०७ मिनिटांनी सुरू होईल आणि १ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजून ०२ मिनिटांनी संपेल.
कन्या पूजन कसे करावे?
पूजा करण्यापूर्वी, ज्या ठिकाणी मुलीची पूजा करायची आहे ती जागा तुम्ही पूर्णपणे स्वच्छ केली जाते. त्यानंतर कन्या पूजेमध्ये फक्त २ वर्ष ते १० वर्षांच्या मुलींना आमंत्रित केले जाते.मुलींना पूजेसाठी बसवण्यापूर्वी तुम्ही त्यांचे पाय दूध किंवा पाण्याने धुवून घेतात आणि मुलींना जेवण देतात. जेवण झाल्यावर मुलींना भेटवस्तू द्या. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार देखील भेटवस्तू निवडू शकता.
तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नक्की काय भेटवस्तू द्यायची. तर आम्ही तुमच्यासाठी स्वस्तात, मस्त आणि मुलींना दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा भेटवस्तूंची यादी घेऊन आलो आहोत; जी कदाचित तुमच्या उपयोगी पडेल.
- बांगड्या
- टिकली
- लहान खेळणी
- चॉकलेट
- वही, पेन्सिल,पेन, रबर, गोष्टींचे पुस्तक
- फणी, रुमाल
फक्त २० ते ५० रुपयांत गिफ्ट म्हणून देता येतील पुढील वस्तू…
- लहान केसांच्या क्लिप्स, रबर बँड, हेअरबँड
- स्टिकर्स
- रंगीत पेन्सिल किंवा क्रेयॉन
- लहान कीचेन
- फॅन्सी बांगड्या किंवा ब्रेसलेट
- पाउच, पर्स, कंपास
- पाण्याची बाटली (लहान आकाराची)
- बिस्किटांचे पुडे
- लहान साईड बॅग
- लंच बॉक्स
- लहान मऊ खेळणी
- ओढणी किंवा स्कार्फ
अशा परवडणारे आणि एकाच वेळी अनेक मुलींना वाटण्यासाठी सोयीस्कर अशा भेटवस्तू तुम्ही घेऊ शकता.